माहिती आहे कशी तयार झाली भारतातील पहिली कोरोना लस ? समजून घ्या सहजपणे..

 

नवी दिल्ली | जगभरात कोरोना लस तयार करण्यासाठी विविध देशांमध्ये चढाओढ सुरू आहे. भारतात कोरोनाची पहिली लस तयार झाली असून त्याला मानवी चाचणी करण्याची परवानगीही मिळाली आहे.

ही लस भारतीय चिकित्सा अनुसंधान संस्था आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी यांच्या सहयोगातून तयार करण्यात आली आहे.

ही लस तयार करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी ने कोरोना लागण झालेल्या पण कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णाच्या शरीरातून कोरोना व्हायरसचा स्ट्रेन वेगळा केला.

त्यानंतर तो स्ट्रेन भारत बायोटेक कडे पाठवण्यात आला. भारत बायोटेक त्या स्ट्रेनपासून एक निष्क्रिय लस तयार केली.

रुग्णांवर या औषधाचा परिणाम होऊ नये म्हणून हैदराबादच्या जीनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल–३ हाय कंटेनमेंट फॅसिलिटीमध्येही मृत व्हायरस पासून ही लस विकसित करण्यात आली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने निष्क्रिय लसीचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे.ही लस जर १५ ऑगस्ट पर्यंत तयार झाली तर भारत हा पहिला देश असेल ज्याच्याकडे कोरोनावर उपचार करणारी लस असेल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.