मनोहरमामा लोकांचे आधार नंबर, पॅन नंबर कसा काय ओळखायचा? गुपित फुटले; आली धक्कादायक माहीती समोर

सोलापूर। पूर्वीच्या काळात व आताच्या काळात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येते. आजच्या शतकात अनेक गोष्टींमध्ये झपाट्याने विकास झाल्याने काही गोष्टीमुळे माणसांची विचार करण्याची पद्धत बदलत गेली आहे. मात्र जगात जरी अनेक गोष्टींमध्ये बदल झाला असला तरी अजूनही बरेचसे सुशिक्षित लोक अंधश्रद्धेला अजूनही बळी पडत आहे.

आपण चित्रपटांमध्ये तर पाहतोच की एकदा भोंदू बाबा अंधश्रद्धेच्या नावाखाली प्रचंड लूटमार करत असतो. समाजातील लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवत असतो. व याच सध्या उदाहरण देखील समोर आहे. अशाच प्रकारची काल्पनिक कथा सोलापूरच्या उंदरगावात सध्या सत्यात आली आहे.

स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवणाऱ्या मन्याचा मनोहर मामा कसा झाला? किंवा जरी आता मनोहर मामा यांच्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी ते एवढा वर्ष कसे काय लोकांचे खरे नाव व माहिती सांगत होते हे आज आपण पाहणार आहोत.

सध्या सातारा ,सोलापूर, पुणे ग्रामीणमध्ये एकच चर्चा आहे ती मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याची. कर्करोग झालेल्या रुग्णास बरा करतो म्हणून त्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहरमामा भोसले याला बारामती पोलिसांनी साताऱ्यातल्या सालपे डोंगरातून ताब्यात घेतलं आहे. मात्र पोलिस कोठडीत असलेल्या मनोहरमामा भोसलेची बुवा होण्यापर्यंतची कहाणी मोठी रंजक आहे.

त्या मनोहर मामाचे अनेक कारनामे पोलिसांनी उघड केले आहेत. मनोहर मामा भक्ताला त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती सांगत असायचा. ती माहिती तो कोठून कशी मिळवत असे याबद्दल पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली आहे. मनोहर मामा मोबाईल मधील अँप आणि सरकारच्या वेबसाईटच्या माध्यमातून भक्तांच्या घरच्यांबद्दल अधिक माहिती देत असायचा.

सरकारच्या वेबसाइटवरून लाखो लोकांची माहिती लीक करण्यात मनोहर मामाच्या टोळीचा समावेश आहे. मनोहर मामाने माहिती लीक करून लोकांना बडण्याचं काम केलेलं आहे. सरकारी अँप माय रेशन नावाच्या अँपमध्ये एका व्यक्तीचा जरी आधार कार्ड नंबर टाकला तरी सर्वांचे नाव त्यात येतात.

त्यात नाव आल्यावर घरातल्या सर्वांची माहिती कळत असल्याचे पण दिसून आले आहे. फक्त कुटुंबातील एका व्यक्तीचे जरी नाव टाकले तरी बाकी सर्वांची माहिती येत असल्याचे पण दिसून आले आहे. व अशा पद्धतीने मनोहर मामा लोकांना फसवत होता.

इंदापूरातल्या लारसुणे गावातला मूळचा असलेल्या मनोहरने वीस वर्षांपूर्वी गावात स्थायिक झाला.
डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून आपली गुजराण करत होता. मात्र, हा मनोहर एक दिवस अचानक गायब झाला.

काही वर्षानंतर पुन्हा याच गावात आपण बंगाली विद्या शिकून आल्याचा दावा त्याने केला आणि आजूबाजूच्या गावची लोक भूत उतरवायला त्याच्याकडे येऊ लागली. मात्र त्यानंतर लालच निर्माण झाली व मनोहर मामाच्या अंगात साक्षात बाळूमामा आल्याची घोषणा मनोहर आणि त्याच्या साथीदारांनी केली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.