हँड सॅनिटाइझर असली की नकली कसे ओळखाल ?, जाणून घ्या…

सध्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. जगभरात डॉक्टरांनी आणि सरकारनेही मास्क वापरा आणि हँड सॅनिटाइझर वापरा अशा सूचना जारी केल्या आहेत. पण हँड सॅनिटाइझर असली की नकली हे कसे ओळखणार याचा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.

कोरोना आल्यापासून सॅनिटाइझरच्या बऱ्याच नवीन कंपन्या उदयास आल्या आहेत. पण त्यातील काहीच कंपन्या अशा आहेत ज्या चांगल्या प्रकारचे हँड सॅनिटाइझर बनवतात. हँड सॅनिटाइझरमध्ये ७० टक्के अल्कोहोल असेल तरच ते कोरोना विषानुवर प्रभावी ठरते.

आपण घरच्या घरीच हँड सॅनिटाइझरची परीक्षा घेऊ शकतो. टिशू पेपरवर ठिकठिकाणी शाईच्या पेनानी गोल करा. आणि त्याच्यावर हँड सॅनिटाइझर टाका जर शाई पांगली तर सॅनिटाइझर नकली आहे.

जर शाई पांगली नाही आणि सॅनिटाइझर काही वेळाने नष्ट झाले तर सॅनिटाइझर असली आहे असं समजा. जर ते जमले नाही तर एका वाटील सॅनिटाइझरचे दोन तीन थेंब टाका आणि वरून हेअर ड्रायरने हवा घाला जर सॅनिटाइझर दोन तीन सेकंदात उडून गेले तर ते वापरण्यास योग्य आहे.

जर हँड सॅनिटाइझरने पिठाचा गोळा होत असेल तर ते नकली आहे आणि जर पिठाचा गोळा होत नसेल तर ते वापरण्यास योग्य व असली सॅनिटाइझर आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.