एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री झाले आहेत.(How to have secret meetings between Devendra Fadnavis and Eknath Shinde? Big statement of Amrita Fadnavis)
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करतानाच प्लॅनिंग सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस यांना मी रात्री गुप्तपणे भेटायचो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले होते. आता अमृता फडणवीस यांनी देखील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होणाऱ्या गुप्त भेटींबाबत मोठा खुलासा केला आहे.
देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी रात्री वेशांतर करून बाहेर पडायचे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना ओळखणे देखील कठीण असायचे, असा खुलासा अमृता फडणवीस यांनी केला आहे. एका मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
या मुलाखतीत अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील गुप्त भेटींच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “देवेंद्रजी रात्री उशिरापर्यंत काम करतात. त्यामुळे माझ्या फार लक्षात आले नाही. पण कधी कधी ते रात्री उशिरा वेशांतर करून बाहेर पडायचे.”
“यावेळी मलाही त्यांना ओळखणे कठीण जायचे. मी त्यांना यासंदर्भात विचारलं की ते विषय टाळायचे. मात्र काही ना काही चाललंय, याची मला कल्पना आली होती”, असे अमृता फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितले. या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीवर देखील भाष्य केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, “एकनाथ शिंदे यांच्या भाषणामधून आपल्याला समजलंच असेल की त्यांच्या पक्षातील आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठया प्रमाणावर नाराजी होती. ती कुठे ना कुठे बाहेर पडणारच होती. त्याला बळ देण्याचं त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम भाजपने केलं आहे”, असे अमृता फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
PHOTO: ‘या’ गावात जन्माला आलं अनोखं बाळ; गावकरी म्हणाले, ‘हा तर देवाचा अवतार’
उद्धव ठाकरेंच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली थेट पवारांची भेट; व्हायरल फोटोंमागील सत्य घ्या जाणून…
‘नुपूर शर्माचा शिरच्छेद करेल त्याला मी माझं घर देईल’, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दर्ग्याच्या खादिमला अटक