शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती; ७/१२ च्या नावात, शेऱ्यात, वारसात दुरुस्ती करायची सोपी पद्धत

सातबारा म्हणजे मालकी हक्काचा भक्कम पुरावा असतो. पण काही वेळेस याच सातबारामध्ये अनेक चुका होतात. सातबारामध्ये झालेल्या चुका दुर्लक्ष करता येत नाहीत. त्या दुरुस्त करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण नंतर या चुकांमुळे तुम्हाला खूप मोठा भुर्दंड भरावा लागू शकतो.

शेतकऱ्यांच्या नावांमध्ये चूका असणे, चुकीची नोंद झालेली असणे, चुकीचे नाव सातबारामध्ये समाविष्ट असणे अशा अनेक समस्यांवर उपाय आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे पूर्ण बातमी वाचा.

चुका दुरुस्ती कशा करायच्या याची माहिती शेतकऱ्यांना नसते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या तहसीलदाराकडे अर्ज करावा लागतो. त्यासाठी तलाठीकडे अर्ज करू नका त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण तहसीलदार या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश तलाठ्याला देत असतात.

अशा चूका झाल्यास हितसंबंधी यांना नोटीस बजावणे आवश्यक असते. चूक झाल्याचे संबंधित व्यक्तीने कबूल केले पाहिजे. अशा व्यक्तीला आपण अर्ज केल्यानंतर तहसीलदार समन्स बजावत असतात.

जर त्या व्यक्तीची कुठलीही तक्रार किंवा आक्षेप घेतला नाही तर विनंती अर्ज मान्य होऊन ते नाव दुरुस्त होते किंवा कमी होते. आता अशा प्रकारच्या सातबारावरील कोणकोणत्या चूक दुरुस्त होतात ते आपण जाणून घेऊया.

सातबारा पुन्हा बनवताना जर एखाद्या व्यक्तीचे नाव लिहायचे राहून गेले असेल तर तुम्हाला या कायद्याअंतर्गत चूक दुरुस्त करता येते. जर पूर्वीच्या सातबाऱ्यात ते नाव असेल किंवा तो शेरा असेल तरच पुन्हा नाविन सातबाऱ्यामध्ये ती चूक दुरुस्त होते.

जर तुम्ही काही दिवसांपूर्वी तहसीलदाराकडे सातबारामधील एखादे नाव कमी करण्यासाठी अर्ज केला असेल आणि जिल्ह्याअधिकाऱ्यांनी अश्या प्रकारचे आदेशही दिले असतील पण जर त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसेल तर तुमची चूक नंतर कलम १५५ नुसार दुरुस्त होऊ शकते.

जर तुम्ही एखादी जमीन खरेदी केली असेल आणि त्या सातबारामध्ये आधीच्या मालकाचे नाव राहिले असेल तर कलम ३२ ग नुसार तुम्हाला नावात बदल करता येतो. पण तुम्ही जमिनीची पूर्ण रक्कम भरलेली असली पाहिजे.

जेव्हा आपण एखाद्या जमिनीचा खरेदी व्यवहार करतो त्यावेळेस त्या जमिनीची रजिस्ट्री कॉपी असते त्यातील महत्वाचा मजकूर जसे वारसदाराचे नाव किंवा जमिनीचे क्षेत्रफळ यामध्ये काही चूक झाली असल्यास ती कलम १५५ अंतर्गत दुरुस्त करता येते.

एखाद्या वारसाचे नाव जर सातबारा सादरी नोंदविण्यात आले नसले तर ते सुद्धा या कायद्यानुसार आपल्याला सातबारामध्ये समाविष्ट करता येते. कुठेतरी मूळ कागदपत्रात केलेला उल्लेख किंवा आदेश नोंदविण्यात चूक झाली असेल तसेच सर्वांचे म्हणणे लक्षात घेऊन अशी चूक दुरुस्त करता येते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.