एकापेक्षा जास्त बॅंकांमध्ये खाते असेल तर सावधान! ‘ही’ माहिती वाचा आणि टाळा तुमचे नुकसान

सध्या बऱ्याच लोकांकडे बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट असतात. गरज नसतानाही लोक एकापेक्षा जास्त अकाउंट उघडतात.
पण नंतर ते या खात्यांना मेन्टेन करू शकत नाहीत.जॉब करणाऱ्याचे बऱ्याचदा दोन अकाउंट असतात. एक त्यांचे सॅलरी अकाउंट आणि दुसरे त्यांचे पर्सनल सेव्हिंग अकाउंट. पण यामुळे नुकसान होऊ शकते.
सेव्हिंग अकाउंटमध्ये कमीत कमी रक्कम ठेवण्याचे बँकेचे नियम असतात. असे नाही केले तर बँक दंड वसूल करते. अनेक बँकांमध्ये कमीत कमी बॅलन्स 10 हजार रुपये असतो.
अशा वेळी तुमच्याकडे दोनपेक्षा जास्त अकाउंट असेल तर तुमची चिंता वाढू शकते. कारण सर्वसामान्यांना सेव्हिंग अकाउंटमध्ये 20 हजार रुपये जमा करणे कठीण होऊन जाते.
पण आता तुम्ही जर एकापेक्षा जास्त बँक खाते उघडले असल्यास आता सावधगिरी बाळगा. कारण एकापेक्षा जास्त खाते उघडण्याचे बरेच नुकसान आहेत. आणि याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल.
आपले बँक खाते चालू ठेवण्यासाठी मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. तसेच, आपण असे न केल्यास, बँक देखील आपल्याकडून त्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारते.
याबाबत तज्ञ असे सांगतात की, जर आपण एखादे बँक खाते बंद केले तर आपल्याला त्यासंदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रांची डी-लिंक करून घ्यावी लागेल. कारण बँक खात्यातून गुंतवणूक, लोन, ट्रेडिंग, क्रेडिट कार्ड पेमेंट्स आणि विम्याशी संबंधित पेमेंटच्या लिंक असतात.
कोणत्याही सॅलरीच्या खात्यात तुम्हाला तीन महिन्यांपर्यंत पगार न मिळाल्यास ते आपोआप बचत खात्यात रूपांतरित होते.
बचत खात्यात बदलल्यास त्या खात्यासाठी असलेले बँकेचे नियमही बदलतात. या नियमांनुसार, त्या खात्यात किमान रक्कम शिल्लक देखील ठेवणे देखील आवश्यक असते आणि जर आपण ही रक्कम न ठेवल्यास बँका त्यासाठी तुम्हाला दंड आकारतात आणि त्या खात्यातून पैसे वजा करतात.
तसेच बर्याच बँकांमध्ये खाते असल्याने इन्कम टॅक्स भरतानाही तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आपल्याला आपल्या प्रत्येक बँक खात्याशी संबंधित माहिती त्यावेळी द्यावी लागते.
तसेच, सर्व खात्यांचे स्टेटमेन्ट्स देणे देखील खूप मोठे काम बनते. आपल्या निष्क्रिय खात्याला योग्यरितीने न वापरल्यास आपण आपले पैसेही गमावू शकतात.
समजा आपल्याकडे अशी चार बँक खाती आहेत ज्यात किमान शिल्लक रक्कम ही 10,000 रुपये असणे आवश्यक आहे. यावर तुम्हाला 4 टक्के दराने वार्षिक व्याज मिळेल. त्यानुसार तुम्हाला सुमारे 1600 रुपयांचे व्याज मिळेल.
आता जर आपण ही सर्व खाती बंद केली आणि ही रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर येथे तुम्हाला किमान 10 टक्के परतावा मिळू शकेल.
आता खाते कसे बंद करायचे हे पाहू
१.खाते बंद करण्याचा फॉर्म भरा. आपले खाते बंद करताना आपल्याला डी-लिंकिंग चा फॉर्म भरावा लागेल. आपले खाते बंद करण्याचा फॉर्म हा आपल्या बँकेच्या शाखेत उपलब्ध असतो.
२.या फॉर्ममध्ये खाते बंद करण्याचे कारण आपल्याला द्यावे लागेल. जर तुमचे खाते जॉईंट अकाउंट असेल तर फॉर्मवर असलेल्या सर्व खातेदारांची सही त्यासाठी आवश्यक असते.
३.यासाठी एक दुसरा फॉर्मही भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला ज्या खात्यात बंद खात्यातील उर्वरित पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्याची माहिती द्यावी लागेल.
४. आपले खाते बंद करण्यासाठी तुम्हाला स्वतः बँकेच्या शाखेत जावे लागेल.
यासाठी लागणारे कागदपत्रे म्हणजे न वापरलेले चेकबुक आणि डेबिट कार्ड बँक बंद करण्याच्या फॉर्मसह जमा करावे लागेल. तसेच खात्यात असणारे पैसे आपल्या इतर बँक खात्यात ट्रान्सफर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो. ही माहिती खुप महत्त्वपुर्ण आहे. याचा वापर करा.
महत्वाच्या बातम्या
रियावर खोटे आरोप करणाऱ्यांना सोडणार नाही; पहा कुणी दिलीय ही धमकी
बाॅलीवूड ड्रग्ज प्रकरण; केंद्र सरकार मोदींशी संबंधीत मोठ्या अभिनेत्याला वाचवण्याच्या प्रयत्नात
राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खुद्द एकनाथ खडसेंनी सोडले मौन, म्हणाले…
तारक मेहतातील जेठालालचे मानधन ऐकून होश उडतील; मोठमोठ्या सेलिब्रीटींना टाकलय मागे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.