चाचणीच्या अगोदर कोरोना पाॅझीटीव्ह आहोत की नाही कसं ओळखायचं? एम्सने सांगीतल्या ह्या टिप्स

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला देशात साडेतील लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजन आणि औषधांचा तुडवडा निर्माण होत आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना टेस्टच्या कीटही कमी पडत आहे. तसेच चाचणीसाठी घेतलेल्या स्वॅब टेस्टचे रिपोर्ट येण्यास विलंब होत आहे. आता याच पार्श्वभुमीवर एम्सच्या तज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे.

रुग्णाने आता कोरोना अहवाल येण्याची वाट पाहत बसु नये. काही लक्षणांवरुन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही हे ठरवले जाऊ शकते. असे म्हणत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी काही लक्षणे सांगितली आहे.

जर एखाद्याची टेस्ट झाली किंवा रिपोर्ट येण्यास उशीर झाला तर कोरोनाची लक्षण असलेल्या रुग्णाला या कोरोना काळात पॉझिटिव्हच समजावे. सध्याच्या काळात अंगदुखी, खोकला आणि सर्दी असेल, तर कोरोनाची लागण झाल्याची अधिक शक्यता आहे.

तसेच कोरोना टेस्ट झाल्यानंतर निगेटिव्ह आल्यानंतरही लक्षणे दिसत असतील, तर आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याची समजावे, असेही डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. तसेच ऑक्सिजन लेव्हल ९४ किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर घाबरण्याचे कारण नाही, असेही गुलेरिया यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रोज साडे तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण भेटत आहे. त्यामुळे लोकांना कोरोनाची लागण होऊ नये, त्यासाठी देशभरात लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. तसेच आता १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना कोरोना लस दिली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

अनुष्का शर्माने ३ इडियट्स चित्रापटासाठी दिले होते ऑडिशन; ऑडिशनचा व्हिडिओ होतोय व्हायरल
श्रीदेवी त्यांच्या मुलींसाठी सोडून गेल्या करोडोंची संपत्ती; आकडा ऐकून पागल व्हाल
जाणून घ्या ७० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री मौसमी चॅटर्जीची कहानी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.