सेकंडहॅंड गाडी घ्यायचा विचार करताय? ‘या‘ गोष्टी चेक केल्या तर फसवणूक नाही होणार

बरेच लोक नवीन गाडी घेण्याच्या ऐवजी सेकंड हॅन्ड म्हणजे जुनी गाडी घेतात. काही जणांची आर्थिक परिस्थिती ठीक नसते म्हणून ते सेकंड हॅन्ड गाडी घेतात ते काही जण पहिल्यांदा सेकंड हॅन्ड गाडीवर चांगल्या प्रकारे हात बसण्यासाठी जुनी गाडी घेतात.

आता यात चुकीचे काहीच नाहीये पण जर तुम्ही जुनी गाडी घेत असाल तर जी गाडी तुम्ही घेणार आहात ती चालवण्यायोग्य आहे का ? हे बघणे गरजेचे आहे. किंवा त्या गाडीच्या किमतीनुसार ती गाडी योग्य आहे का ? या सर्व गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सर्वात आधी जी सेकंड हॅन्ड गाडी तुम्ही घेणार आहात ती गाडी किती वर्षे जुनी आहे हे बघणे सर्वात महत्वाचे आहे. तसेच या आधी ही गाडी किती मालकांनी चालवली आहे हे बघणे गरजेचे आहे. नंतर मालकाकडून गाडीची चावी घ्या आणि गाडी चालवून बघा.

जर मालक तुम्हाला गाडी टेस्ट ड्राइव्ह करण्यासाठी देत असेल तर बिनधास्त घ्या. गाडीच्या इंजिनचा आवाज येत नाहीये ना हे चेक करा. आता सर्वात आधी गाडी चारही बाजूने नीट बघा. आता गाडीचा रंग बघा. जर गाडीच्या दरवाजाचा आणि गाडीच्या रंगामध्ये फरक दिसत असेल तर गाडीला परत रंग दिला आहे असं समजा.

त्यानंतर गाडीचा रनिंग बोर्ड ठीक आहे का ? हे बघा. ते बघितल्यानंतर गाडीचे टायर बघा. गाडीचे टायर चांगल्या कंपनीचे आहेत का ? किंवा गाडीचे टायर चांगल्या कंडिशनमध्ये आहेत का ? हे बघा. त्यानंतर गाडीचे बंपर बघा.

गाडीचे बंपर वगैरे जर निघाले असायची किंवा निघालेले बंपर परत लावले असतील तर त्यावर तुम्हाला खुणा दिसतील. पण बंपरने एवढा काही फरक पडत नाही. त्यानंतर गाडीचे छत नीट आहे का बघा. जर गाडीला साधारण खुणा पडलेल्या असतील तर गाडी फक्त त्याच्यामुळे गाडी सोडू नका.

गाडी बाहेरून जरी नीट दिसत नसेल पण तिचे इंजिन चांगले असू शकते. त्यानंतर गाडीचे पिलर चेक करा. जर गाडीचे दरवाजे थोडेजरी वाकडे झाले असतील तर समजून जा हिचा याआधी अपघात झालेला आहे. दरवाजाला जे रबर असते ते रबर काढून बघा तुम्हाला तिथे वेल्डिंगच्या खुणा दिसतील. जर खुना नसतील तर गाडी ठीक आहे.

गाडीचे बोनेट खोला. जर बोनेटला वेल्डिंगच्या खुणा असतील तर गाडीचा समोरून अपघात झालेला आहे असे समजा. पण जर गाडीच्या चेसीला धक्का लागला असेल. म्हणजे गाडीची चेसी जर वाकडी झाली असेल किंवा वेल्डिंग केलेली असेल तर गाडीचा मोठा अपघात झाला आहे असे समजा.

यानंतर गाडीचे किलोमीटर चेक करा. इंजिनची चेक करायचे असेल तर गाडी चालू करा आणि फ्युएल गेज काढा जर फ्युएल गेजमधूज धूर येत असेल आणि इंजिन जास्त गरम होत असेल तर इंजिनची अवस्था जास्त ठीक नाहीये असे समजा.

पुढे गाडी चालवून बघा जर गाडी चालवताना सस्पेंशनचा आवाज येत असेल किंवा खड्ड्यातून गाडी नेल्यानंतर जास्त दचके बसत असतील तर सस्पेंशन खराब आहे. गाडीचा एसी काम करतोय का बघा.

गिअर बॉक्स ठीक आहे का बघा. हे सर्व बघून झाल्यानंतर तुमच्या ओळखीचा एखादा गॅरेज मॅकेनिक असेल तर त्याला गाडी दाखवा आणि त्याला विचारून तुम्ही गाडीची किंमत ठरवू शकता.

महत्वाच्या बातम्या
आयपीएल जिंकल्यानंतर रोहित शर्माने सांगितली स्पर्धा जिंकण्याची रणनीती, म्हणाला…

मुंबई संघातील सर्व ११ खेळाडू सामने जिंकणारे, २ खेळाडू तर आजपर्यंत आंतरराष्ट्रीय खेळले नाहीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.