Share

क्लायमॅक्सचा सीन शूट करताना ढसाढसा रडली अभिनेत्री, वाचा ‘द काश्मीर फाइल्स’ च्या सेटवर काय घडलं?

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत १७५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकांना अश्रू अनावर होत आहेत.(how the the kashmir files climax scene shoot actress shear story)

या चित्रपटाचा शेवटचा क्लायमॅक्सचा सीन कसा चित्रित झाला, यासंदर्भात एका अभिनेत्रीने माहिती दिली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री वृंदा खेर यांनी यासंदर्भात सांगितले आहे. एका मुलाखतीत(Interview) त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. अभिनेत्री वृंदा खेर यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर यांच्या भाचीची भूमिका केली आहे.

क्लायमॅक्सचा सीन चित्रित करणे कलाकारांसाठी आव्हानात्मक होते, असे अभिनेत्रीने सांगितले. अभिनेत्री वृंदा खेर यांनी या चित्रपटात भवानी कौल या एका काश्मिरी पंडित महिलेची भूमिका साकारली आहे. १९९० मध्ये दहशतवाद्यांनी काश्मीरमधील हिंदूंवर हल्ला केला होता. ‘काश्मीर सोडा किंवा मृत्यू स्वीकारा’ असा नारा त्यावेळी दहशतवाद्यांनी दिला होता.

चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या सीनमध्ये काश्मिरी पंडितांची हत्या कशाप्रकारे करण्यात आली, हे दाखवण्यात आलं आहे. या सीनबद्दल माहिती देताना अभिनेत्री वृंदा खेर यांनी सांगितले की, “क्लायमॅक्स शूट करणं टीमसाठी फार अवघड होतं. कारण वास्तविक जीवनातील घटना लक्षात ठेऊन त्या भावना पडद्यावर साकारायच्या होत्या.”

“क्लायमॅक्समध्ये शारदा पंडितची भूमिका साकारणारी अभिनेत्री भाषा सुंबळीचा एक सीन आहे. दहशतवादी बिट्टसोबतचा हा सीन शूट करणं सर्वाधिक कठीण होतं. हा सीन चित्रित करताना अभिनेत्री भाषा सुंबळी हीला रडू कोसळलं. हे खूप आव्हानात्मक दृश्य होतं. त्यामुळे सीन चित्रित करताना कलाकारांच्या ज्या भावना समोर आल्या आहेत, त्या खऱ्या आहेत”, असे अभिनेत्री वृंदा खेर यांनी सांगितले आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कर्नाटक, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. इतर राज्यांमध्ये देखील हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘मला कपडे काढून नाचण्यास सांगितले’, अभिनेत्रीचा काश्मीर फाइल्सच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप
स्वप्न पुर्ण करण्यासाठी रस्त्यावर धावणाऱ्या प्रदीपची मदत करण्यास महिंद्रांचा साफ नकार; म्हणाले, तो एक…
देशातील प्रसिद्ध हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाची धाड; २४ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now