‘या’ कारणांमुळे तुम्हाला येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; जाणून घ्या कसा करायचा बचाव

आजकाल सर्रास हृदयरोग होताना पाहायला मिळतो. हृदय शरिराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयरोगाची अनेक करणे आपल्याला पाहायला मिळतील.

जेव्हा हृदयरोग होतो तेव्हा रक्तवाहिन्यामध्ये चरबीचे थर जमा होतो आणि हे थर रक्तप्रवाह पूर्णपणे ब्लॉक करतात. आणि त्यामुळे हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा होणे थांबते. यामुळे छातीत तीव्र वेदना सुरु होतात. ज्याला ‘हृदयविकाराचा झटका’ म्हणतात.

हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायुंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. जेव्हा आपण शारीरिक श्रमाची काम करतो तेव्हा हृदयाला अतिरिक्त रक्ताची गरज असते. जर रक्तपुरवठा कमी होत असेल तर ते शक्य होत नाही आणि परिणामी हृदयाचे स्नायू संकुचित होतात.

भारतासारख्या विकसनशील देशात दरवर्षी लाखो लोक हृदयविकाराचे शिकार होतात. भारतीयांसहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो.

हृदयविकार होण्याची करणे:- धूम्रपान करणे, मधूमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉल, शारिरीक श्रमाची कमतरता, अनुवंशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता

हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीरात दिसून येणारी लक्षणे:- हृदयविकाराच्या सुरुवातीला काही करण नसताना अचानक काही सेकंदासाठी चक्कर येते. तसेच काहीच श्रम न करता खूप घाम फुटू शकतो. चेहरा फिका पडते, कसतरी वाटण आणि खूप भीती वाटते.

छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो. साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात. तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात. इतर लक्षणे जसे मळमळ, ऊलट्या, अस्वस्थता, कफ, कंप अशी आहेत व ह्या वेदना सुमारे २० मि. पेक्षा जास्त काळ टिकतात.

अश्यावेळी मदतीसाठी तातडीने कुणालातरी बोलवा, शारीरिक हालचाल जास्त करू नका. तसेच रुग्ण बेशुद्ध झाला असल्यास प्रशिक्षित व्यक्तीकडून सीपीआर देण्याचा प्रयत्न करा. तातडीने तज्ञ डॉक्टरांची मदत घ्या.

जोपर्यंत वैद्यकिय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे. जर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरीत ऑक्सिजन द्यावे. हृदयविकारावर झटकन वैद्यकिय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते.

हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मिठ कमी असावे, फाइबर आणि जटिल कार्बोहाइड्रेट उच्च मात्रेत असावे. वजन जास्त असणा-यांनी वजन कमी करावे. शारिरीक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे. धूम्रपान करु नये व करत असल्यास त्वरित बंद करावे.

टीप:- हा लेख सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला आहे. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे ही वाचा-

रोनाल्डोमुळे काही सेकंदात कोका कोला कंपनीचे २९ हजार कोटींचे नुकसान, पाहा तो विडिओ..

गंगा नदीत तरंगणाऱ्या पेटीतून येत होता विचित्र आवाज; पेटी उघडताच सर्वांना बसला धक्का

‘लगान’ चित्रपटातील गोरी मॅम आज दिसते ‘अशी’; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.