अशी आखली गेली अर्णब गोस्वामींना अटक करण्याची प्लॅनिंग; ४० पोलिसांच्या टीमने फत्ते केले काम

२०१८ मध्ये घडलेल्या वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ४० पोलिसांची टीम बनवली होती.

अटक होणार या भीतीने अर्णब गोस्वामी मुंबईबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी अत्यंत गोपनीयता राखत ऑपरेशन अर्णब पार पडले. या आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांना नव्याने तपास करण्यास परवानगी मिळाली होती.

मग काही दिवसांनी ऑपरेशन अर्णबची तयारी सुरू झाली. संजय मोहिते यांनी योजना आखली. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एनकाऊंटर स्पेशालिस्ट सचिन वझे यांना देण्यात आली होती.

इतक्या मोठ्या पत्रकाराला अटक करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. अटक करताना अर्णबकडून प्रचंड उकसवण्याचा प्रयत्न होत होता पण पोलिसांनी प्रचंड सय्यम राखला होता.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांचा हात असल्याची प्राथमिक माहिती तपासात मिळाली होती. त्यानंतर या ४० जणांच्या टीमने अर्णब राहत असलेल्या इमारतीची अनेकदा पाहणी केली.

हे काम अत्यंत गोपनीय होते कारण अर्णबला थोडीजरी भनक लागली असती तर ते मुंबईबाहेर पळून गेले असते. अर्णब गोस्वामींना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली. अर्णब घरीच असल्याची खात्री त्यांना होती म्हणून त्यांनी सकाळची वेळ निवडली होती.

अगदी बारीक बारीक गोष्टींची खबरदारी घेण्यात आली होती. अर्णब गोस्वामींच्या घराचे दार कोण वाजवणार? त्यांच्या कुटुंबाशी कोण बोलणार? विरोध केला तर काय करायचे? हे सगळं आधीच ठरवलं होतं.

सचिन वाझे यांनी अर्णब यांना सांगितले होते की, जर तुम्ही आम्हाला सहकार्य केले नाही तर कायदेशीर अडचणी उभ्या राहतील. यानंतर अर्णब पोलिसांसोबत यायला तयार झाले. अशा प्रकारे ही मोहीम फत्ते झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.