सरकारचे किती दिवस शिल्लक; हे ज्योतिष फडणवीसच सांगू शकतात – प्रकाश आंबेडकर

 

अकोला। “राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे आणखी किती दिवस शिल्लक आहेत, याचे भाकीत देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील”, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

त्यांनी सोमवारी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या स्थैर्याविषयी भाष्य केले होते.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, “राज्य सरकार किती वर्ष टिकेल, हे ज्योतिष देवेंद्र फडणवीस यांना विचारा, ते याबद्दल सांगू शकतील”. सत्ताधारी पक्ष असो वा विरोधक कोणीही बारा बलुतेदारांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही.

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये कुंभार व नाभिक समाजाच्या प्रश्नांसाठी वंचितला जोरदार लढा द्यावा लागला. तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली.

आता मात्र मच्छीमारांचा प्रश्न बिकट झाला आहे. मच्छीमार, कोळी बांधव नसलेल्या बोगस सोसायट्यांना मच्छिमारी करण्याचे ठेके दिले जात आहे.

त्यात सुधारणा करून वर्षानुवर्षे, परंपरागत मच्छीमारी करीत आलेले आहेत. अशा मच्छिमार बांधवांना ठेका देण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.