लस घेतल्यानंतर किती दिवस तुमचा कोरोनापासून होईल बचाव? आरोग्य मंत्रालयाने केले स्पष्ट

मुंबई। सध्या देशात कोरोना विषाणूचा धोका असल्याने त्यापासून बचावासाठी नागरिक लस घेत आहेत. मात्र याच लसीसंदर्भातील एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्राचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास सांगतात की, कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती किती दिवस टिकेल हे अजूनही निर्धारित करण्यात आलेलं नाही.

लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. ‘पहिला डोस घेतल्यानंतर साधारणत: 42 दिवसांनी शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. पण, यासाठी लसीचा दुसरा डोसही घेणं गरजेचं आहे.’ त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क घालणं, हात धूणं, सोशल डिस्टंसिंगचं पालन महत्त्वाचं आहे, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. दोन्ही डोस घेतल्यानंतरही मास्क घालणं, हात धूणं, सोशल डिस्टंसिंगचं पालन महत्त्वाचं आहे. गेले वर्ष दीड वर्षभर जगात कोरोना विषाणूच्या महामारीमुळे संपूर्ण देश हैराण झाले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने गेल्या वर्षभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. एकीकडे कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने त्यावर भारतासह सर्वच देश लसीकरणावर सर्वाधिक भर देत आहेत. भारतात १ मार्च पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे. देशात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्फुटनिक व्ही या लसी नागरिकांना दिल्या जात आहे.

व नागरिक देखील मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी आपली नोंदणी करत आहे. नागरिकांचा लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र जरी नागरिक कोरोना लसीचे दोन्ही डोस घेत असले तरी त्यांनी संपूर्ण काळजी घेणे महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या
विचित्र पण खरे! या विधीनंतर लग्नानंतर तीन दिवस वधू-वराला शौचालयाला जाता येत नाही
भाऊ प्रल्हाद मोदींनी नरेंद्र मोदींचे पितळ पाडले उघडे; म्हणाले ते चहावाले नाहीतच!
अरे बाप रे! व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून पोटात गेला ईल मासा, मग पुढे घडला हा धक्कादायक प्रकार
तुम्हीही हेअर कलर करता का? करत असला तर तुम्हालाही करावा लागेल या आजारांशी सामना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.