IPL मध्ये कसा जिंकला जातोय सामना? पत्रकार परिषद घेऊन झहीर खानने केली सगळ्यांची पोलखोल, म्हणाला…

IPL 2025 च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला पंजाब किंग्जकडून 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 171 धावा केल्या, मात्र श्रेयस अय्यरच्या पंजाब संघाने हा टार्गेट सहज पूर्ण केला. या हंगामातील लखनऊचा हा दुसरा पराभव ठरला.

या पराभवानंतर संघाचा मार्गदर्शक झहीर खानने खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त करत पीच क्युरेटरवर गंभीर आरोप केले आहेत.

झहीर खानची खेळपट्टीवर तीव्र नाराजी

लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक झहीर खानने एकाना स्टेडियमच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या सामन्यासाठी पंजाबच्या क्युरेटरने पीच तयार केल्याचा आरोप करत त्याने नाराजी दर्शवली.

झहीर खान म्हणाला,
“माझ्यासाठी हा सामना निराशाजनक ठरला, कारण हा आमचा घरचा सामना होता. आयपीएलमध्ये संघ घरच्या मैदानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे वाटते की आमच्या क्युरेटरने याचा विचारच केला नाही. मला वाटतं की पंजाबच्या क्युरेटरनेच खेळपट्टी तयार केली आहे.”

लखनऊच्या चाहत्यांना अपेक्षाभंग

झहीर खानने पुढे सांगितले की,
“लखनऊचे चाहते मोठ्या अपेक्षांसह पहिला घरचा सामना पाहायला आले होते. आम्हाला आत्मविश्वास आहे, आम्ही सामना हरलो हे स्वीकारतो. पण घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. येथील उर्वरित सहा सामन्यांमध्ये आम्ही दमदार पुनरागमन करू.”

लखनऊ सुपर जायंट्सचा हा पराभव संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरला असून, झहीर खानच्या विधानामुळे पीच क्युरेटरवर नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.