बॉलिवूडचा सीरियल किसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमरान हाश्मीने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. इमरान हाश्मीने आपल्या अभिनयाने बॉलिवूड इंडस्ट्रीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेता इम्रान हाश्मी नेहमीच त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने त्याच्या कारकिर्दीत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.(How Imran Hashmi, who was scared of the camera, became Bollywood’s ‘serial kisser’)
अभिनेता इमरान हाश्मीचा आज ४३ वा वाढदिवस आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेता इमरान हाश्मीचा एक चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची झुंबड उडाली होती. २००३ मध्ये ‘फुटपाथ’ या चित्रपटापासून अभिनेता इमरान हाश्मीने आपल्या फिल्मी करिअरला सुरवात केली.
अभिनेता इमरान हाश्मीचा जन्म २४ मार्च १९७९ रोजी मुंबईत झाला होता. इमरान हाश्मीचे वडील सय्यद अन्वर हाश्मी एअर इंडियाच्या कार्गो विभागात काम करायचे. इमरानची आई एका मल्टी नॅशनल कंपनीत काम करायची. इमरानचे प्राथमिक शिक्षण जमनाबाई नरसी शाळेत झाले. इमरान हाश्मीचे महाविद्यालयीन शिक्षण सिंधम कॉलेजमध्ये झाले.
अभिनेता इमरान हाश्मीला अभ्यासात विशेष रस नव्हता. कॉलेजमध्ये असताना इमरान त्याच्या मित्रांसोबत फिरायचा. त्याच्या घराजवळ एक दुकान होते. ते ठिकाणी इमरान आणि त्याच्या मित्रांचा अड्डा होता. चित्रपट कुटुंबातील असताना देखील इमरानला कधीही चित्रपटात काम करण्याची इच्छा नव्हती. इमरान हाश्मी चित्रपट क्षेत्रात अचानक आला होता.
२००४ साली ‘फुटपाथ’ चित्रपटाचे शूटिंग करत असताना इमरान हाश्मी कॅमेऱ्यासमोर उभं राहायला देखील घाबरत होता. या चित्रपटातील पहिला सीन शूट करण्यासाठी त्याला ४० रिटेक द्यावे लागले. २००७ मध्ये अभिनेता इमरान हाश्मीचा ‘आवारापन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील इमरान हाश्मीच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते.
२००८ मध्ये आलेल्या अभिनेता इमरान हाश्मीच्या ‘जन्नत’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतलं होतं. हा चित्रपट मॅच फिक्सिंगवर आधारित होता. या चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मीने बुकीची भूमिका केली होती. हा चित्रपट पाकिस्तानमध्ये देखील प्रदर्शित झाला होता. लाहोरमधील एका सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी चेंगराचेंगरी झाली होती.
गेल्या काही वर्षांपासून अभिनेता इमरान हाश्मी वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करत आहे. पण ते चित्रपट तिकीटबारीवर अयशस्वी झाले आहेत. अलीकडेच त्याने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘चेहरे’ या चित्रपटात काम केले होते. आता अभिनेता इमरान हाश्मी सलमान खानची भूमिका असणाऱ्या ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
टाटा समूहाच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला छ्प्परफाड १००० टक्के परतावा
काश्मीर फाइल्सचा विरोध करणाऱ्या लोकांना हा फोटो दाखवा’, विवेक अग्निहोत्रींचं विरोधकांना प्रत्युत्तर
वयाच्या 23 व्या वर्षीच करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे ऋषभ पंत, एका सामन्याला घेतो ‘एवढी’ फी