खोकण्यातून होतो कोरोनाचा प्रसार? वाचा संशोधनातून काय आले समोर 

मुंबई | दिवसेंदिवस सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर वाढतच चालला आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना देखील रुग्ण वाढत आहे. याचबरोबर वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण देखील वाढताना पाहायला मिळत आहे.

अशातच कोरोना संसर्ग कसा आणि किती वेळात होतो. याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ हाय परफॉर्मन्स कंप्युटिंगमधील संशोधकांनी केले आहे. तसेच हे संशोधन ‘Physics of Fluids या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

तसेच यामध्ये high fidelity air flow simulation चा वापर करत थेंबाचा प्रसार कशा पद्धतीने होतो याचा संख्यात्मक अभ्यास करण्यात आला आहे. खोकल्याचा एक थेंब जवळपास ७ मीटरपर्यंत पसरू शकतो. हवेचा वेग जर सेकंदाला २ मीटरपर्यंत गृहित धरला तर हा खोकल्याचा थेंब ६.६. टरपर्यंत प्रवास करतो, असे संशोधनातून समोर आले आहे.

दरम्यान, या संशोधनातून असे दिसून आले आहे की, खोकल्याचे मोठे थेंब गुरुत्वाकर्षणामुळे लगेच खाली बसतात. मात्र काही थेंबांना गती असल्यामुळे वारं वाहत नसतानाही ते १ मीटरपर्यंत हवेत पसरू शकतात, असे या संशोधनातून दिसून आले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
‘ठाकरे सरकारचा कारभार म्हणजे ‘चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा’
अपयशी विराटमुळेच आरसीबी आयपीएल जिंकली नाही; सुनील गावसकरांची सडेतोड टिका
‘अर्णबचा छळ सुरूय; त्याच्या जीविताला धोका निर्माण झाल्‍यास ठाकरे सरकार जबाबदार’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.