Share

Shane Warne : कसा झाला शेन वॉर्नचा अंत अखेर ? ३ वर्षानंतर रहस्य उलगडले, हॉटेलच्या रुममधून गायब झाले होते पुरावे

Shane Warne : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, वॉर्नचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या व्हिलामधून एक महत्त्वाची वस्तू काढून टाकण्यात आली होती.

शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये मृतावस्थेत सापडला होता. डेली मेलच्या अहवालानुसार, घटनास्थळी उपस्थित एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला कामाग्रा नावाच्या औषधाची बाटली हटवण्याचे आदेश देण्यात आले होते.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

कामाग्रा हे औषध इरेक्टाइल डिसफंक्शनच्या उपचारासाठी वापरले जाते आणि त्यातील घटक व्हायग्रासारखाच असतो.

एका पोलिस अधिकाऱ्याने डेली मेलला दिलेल्या माहितीनुसार, “वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला हे औषध हटवण्याचे आदेश दिले होते. हे आदेश थेट उच्च स्तरावरून आले होते आणि यात वरिष्ठ ऑस्ट्रेलियन अधिकारीही सामील असण्याची शक्यता आहे.”

त्यांनी असेही सांगितले की, “ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व वादात अडकू नये, यासाठी हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न झाला असावा.”

अधिकृत अहवालात हृदयविकाराचा झटका मृत्यूचे कारण

अधिकृत शवविच्छेदन अहवालात शेन वॉर्नच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यामागील इतर कोणत्याही कारणाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

डेली मेलच्या अहवालानुसार, कोणीही कामाग्राच्या उपस्थितीबाबत अधिकृतपणे बोलण्यास तयार नाही, कारण हे प्रकरण अजूनही अत्यंत संवेदनशील मानले जात आहे.

५२ व्या वर्षी शेन वॉर्नचे निधन

शेन वॉर्नचा ५२ व्या वर्षी थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यावेळी तो त्याच्या मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेत होता.

शवविच्छेदन अहवालात वॉर्नच्या मृत्यूत कोणताही गैरप्रकार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली नाही, अशी अनेकांची भावना आहे.

थाई अधिकाऱ्यांनी वॉर्नच्या मृत्यूनंतर त्याचे पार्थिव शक्य तितक्या लवकर ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे अनेकांना वाटले की या प्रकरणाची योग्य चौकशी झाली नाही.

मृत्यूभोवती अजूनही अनिश्चितता

शेन वॉर्नच्या आकस्मिक निधनामुळे क्रिकेट जगतात शोककळा पसरली होती. मात्र, त्याच्या मृत्यूबाबत सातत्याने नवीन दावे समोर येत असल्याने हा विषय अजूनही चर्चेत आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now