एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे सुरु झालेलं सत्तानाट्य अखेर संपलं आहे. या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळलं आहे. शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि आमदार एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत.(How did Fadnavis suddenly accept the post of Deputy Chief Minister?)
तसेच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. पत्रकार परिषदेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली होती. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. पण अचानक देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली होती.
सुरवातीला सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगणारे देवेंद्र फडणवीस यांनी अचानक कसे काय उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. या प्रकरणाची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगितले.
त्यानंतर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री व्हावं, अशी मागणी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं, अशी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची इच्छा असल्याचे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितले होते.
तरीही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत होते. देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्ये सहभागी होण्याची इच्छा नव्हती. त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असा केंद्रीय नेतृत्वाचा आग्रह होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना दोनदा फोन करून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
देवेंद्र फडणवीस यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आदेश टाळता आला नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. अमित शाह यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याची माहिती दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
नॅशनल भालाफेक खेळाडूचे फुफ्फुसं झालेत निकामी, उपचारासाठी दरमहा ‘एवढा’ खर्च, पैशांची टंचाई
औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे का बदलली? काय आहे या नावांमागचा इतिहास?
आमचे सरकार २५ वर्षे टिकणार; देवेंद्र फडणवीस यांची गर्जना