Share

नारळ पाणी पिऊन आणि पेन पेपर घेऊन आशिष नेहराने कसा बांधला गुजरात टायटन्ससारखा संघ?

इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा मोसम गुजरात टायटन्स या संघासाठी संस्मरणीय ठरला आहे. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सचा संघ पहिल्यांदाच स्पर्धेत खेळत  होता. लीग टप्प्यात गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयलविरूध्द सहज विजय मिळवला आहे.

पहिला हंगाम खेळणाऱ्या गुजरातने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे. गुजरातच्या या यशामागे त्यांचे प्रशिक्षक आशिष नेहरा यांचेही मोठे योगदान आहे. आयपीएल ट्राफी जिंकण्यासोबतच आशिष नेहराने खास विक्रम ही केले आहेत.

आयपीएलच्या मागील १४ व्या हंगामापर्यत कोणत्याही भारतीय प्रशिक्षकाला ट्राफी मिळवता आली नाही. १५ व्या हंगामात दोन नवीन संघ स्पर्धेत सहभागी करण्यात आले होते. हे दोन्हीं संघ भारतीय दिग्गजांच्या देखरेखीखाली मैदानात उतरले होते.

मागील १४ व्या हंगामापर्यत आयपीएल ट्राफी जिंकणाऱ्या संघाला परदेशी प्रशिक्षक होते. १५ व्या हंगामात भारतीय प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली  जिंकणारा गुजरात टायटन्स हा पहिलाच संघ ठरला आहे. आशिष नेहरा हा आयपीएल ट्राफी जिंकणारा पहिला भारतीय प्रशिक्षक ठरला आहे.

१४ व्या हंगामापर्यत आयपीएल ट्राफी जिंकणारे परदेशी प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (चेन्नई सुपर किंग्ज), महेला जयर्वधने (मुंबई इंडियन्स), ट्रेवर बेलिस (कोलकाता नाईट रायडर्स), टॉम मूडी, रिकी पॉटिंग, जॉन राइट, डॅरेन लेहमन आणि शेन वॉर्न यांनी संघाला आयपीएल ट्राफी जिंकून दिली आहे.

गुजरात टायटन्स संघाने साखळी फेरीत १४ पैकी केवळ १० सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्स संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल संघाविरूद्ध क्वालिफायर १ जिंकून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते. अंतिम सामन्यात राजस्थान संघावर गुजरातने बाजी मारली आहे.

महत्वाच्या बातम्या:-
लग्नाच्या 30 वर्षांनंतर दोघांतील नात्यावर बोलली अर्चना पूरणसिंह; म्हणाली, वयातील फरकामुळे…
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा मृत्यू झालाय, त्यांच्याजागी सत्तेवर त्यांच्यासारखाच दिसणारा….
भाजपने विनोद तावडेंचा केला ‘टप्प्यात कार्यक्रम,’ दुसऱ्यांदा दिला डच्चू

 

 

 

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now