कोब्रा कमांडो राकेश्वर यांची १०० तासांनी सुटका कशी झाली? वाचा इनसाईड स्टोरी

छत्तीसगढ येथील बीजापूर जिल्ह्यामध्ये नक्सलवाद्यांनी सुमारे १०० तासांनी कोबरा कमांडोची सुटका केली. ३ एप्रिलला जवानांमध्ये आणि नक्सलवाद्यांमध्ये मुठभेड झाली होती. त्यावेळी त्यांनी २१० कोबरा कमांडो बटालियनच्या राकेश्वर सिंह मन्हास यांना बंदी बनवले होते.

गुरूवारी छत्तीसगढ सरकारने माहिती दिली की कोब्रा कमांडोला सुखरूप सोडण्यात आले आहे पण यामागची इनसाईड स्टोरी खुप रोमांचक आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की अदिवासी समुदायाच्या एका व्यक्तीसोबत दोन प्रतिष्ठित लोकांच्या टीमसोबत गावातील अनेक लोकांच्या उपस्थितीत कोब्रा कमांडोला सोडण्यात आले होते.

राज्य सरकारने या लोकांना नेमले होते आणि त्यांना त्या ठिकाणी पाठवले होते. राज्य सरकारने जी टीम पाठवली होती त्या टीममध्ये एका ९१ वर्षांच्या व्यक्तीचा समावेश होता जे की एक स्वतंत्र सेनानी होते आणि त्यांना पद्मश्री पुरस्कारसुद्धा मिळाला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या रिपोर्टनुसार त्या व्यक्तीचे नाव आहे धरमपाल सैनी, जे की एक समाजसेवकसुद्धा आहेत आणि त्या भागातील मुलींना ते शिक्षण देण्याचे काम करतात. याव्यतिरीक्त सरकारकडून पाठवलेल्या टीममध्ये गोंडवाना समाजाचे अध्यक्ष तेलम बोरैया, सात पत्रकार आणि दोन अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश होता.

नक्सलवाद्यांनी जवानाला गावकऱ्यांच्या समोर सोडून दिले. अर्धसैनिक बलाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की जम्मूमध्ये राहणाऱ्या जावानाला बीजापूर येथील केंद्रिय रिजर्व पोलिस दलाच्या तर्रेम शिवीर येथे आणण्यात येणार आहे. दूसरीकडे कोब्रा कमांडोच्या पत्नी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की आज माझ्यासाठी खुप आनंदाचा दिवस आहे.

जेव्हा कोब्रा कमांडोला नक्सलवादी घेऊन गेले होते तेव्हा त्यांच्या पत्नीचा आणि मुलीचा एक भावनिक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी आपल्या पत्नीला सोडण्याची विनंती केली होती. दरम्यान, नक्सलवाद्यांच्या या हल्ल्यात २३ जवान शहीद झाले होते. शनिवारी ५ जवानांचे मृतदेह सापडले होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी १८ जवानांचे मृतदेह सापडले होते. तसेच अनेक जवान या मुठभेडीत जखमी झाले होते.

महत्वाच्या बातम्या
एकाचवेळी ४२ कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार, अहमदनगरमधील मन सुन्न करणारी घटना
महाराष्ट्रासाठी राहूल गांधी मैदानात! वॅक्सीन पुरवठ्यातील भेदभावावरून मोदी सरकाराला सुनावले
“सचिन वाझे प्रकरणात माझीही चौकशी करा आणि दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या”
मधल्याकाळात माझा ट्रॅक चुकला होता, पण आता पुर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय करणार- कल्याणराव काळे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.