‘राष्ट्रवादीचा गृहमंत्री असल्यावरच दाऊद कसा सक्रिय होतो?’

मुंबई। उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट पाकिस्तानी समर्थक अतिरेक्यांनी आखला होता, मात्र त्याआधीच दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी समर्थक अतिरेक्यांचा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी ६ अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यात महाराष्ट्र, दिल्ली व उत्तर प्रदेश याठिकाणाहून अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे.

मात्र आता यावरून भाजपकडून गृहमंत्री व ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादीचा गृहमंत्री असल्यावरच दाऊद कसा सक्रिय होतो? असा सवाल भाजपचे नेते योगेश सागर यांनी राष्ट्रवादी तसेच ठाकरे सरकारला विचारला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.

योगेश सागर ट्विटमध्ये म्हणाले आहे की, ‘दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रासह ३ राज्यातून ६ अतिरेकी पकडले आहेत.त्यांचा मुंबईसह देशातल्या महत्त्वाच्या शहरात २६/११ सारखा हल्ला करायचे नियोजन होते.या कटाचा सूत्रधार अनिस इब्राहिम आहे.

मात्र राष्ट्रवादीचा गृहमंत्री असल्यावरच दाऊद कसा सक्रिय होतो? असा सवाल करणारे ट्वीट भाजपचे योगेश सागर यांनी केले आहे. त्यामुळे आता भाजपकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता. व यासाठी मॉड्यूलच्या वेगवेगळ्या संशयितांना आणि त्यांच्या नेटवर्कशी संबंधित लोकांना वेगवेगळी कामे दिली गेली.

या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हा खुलासा केला. त्यामुळे आता या टीकेला राज्य सरकार किंवा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
“पांढरे केस का लपवत नाहीस?”; वडिलांच्या प्रश्नावर समीरा रेड्डीने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली… 
मुस्लिम कुटुंबाच्या घरी दरवर्षी येतो बाप्पा! बाप्पामुळेच पुत्ररत्न लाभल्याचा रेहमानचा दावा
‘…जर झोपलेली जनता जागी झाली, तर मोदी सरकारही कोसळेल’- अण्णा हजारे 
मराठमोळी अभिनेत्री कविता मेढेकर यांनी शेअर केला मुलीसोबतचा फोटो, फोटो बघून घायाळ व्हाल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.