पानटपरी चालवनारे भाऊ कदम अख्ख्या महाराष्ट्राचे हास्यसम्राट झाले; पहा कसा झाला हा चमत्कार

सध्या महाराष्ट्रातील टेलिव्हिजनवर अनेक कार्यक्रम प्रसिद्ध आहेत. पण काही ठराविक कार्यक्रमांनी लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. असाच एक कार्यक्रम म्हणजे झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’.

महाराष्ट्राला हसवण्यात हा कार्यक्रम सर्वात पुढे आहे. या कार्यक्रमाने लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार खुप प्रसिद्ध आहेत. यातलच एक नाव म्हणजे भाऊ कदम. भाऊ कदम यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

भाऊ कदम यांनी छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत त्यांचा दबदबा निर्माण केला. त्यांचा अभिनय पाहून लोकांना लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके आणि अशोक सराफ या कलाकारांची आठवण येते. जाणून घेऊया भाऊ कदम यांच्या अभिनय प्रवासाबद्दल.

भाऊ कदम यांच्या जन्म १२ जुन १९७२ ला मुंबईत झाला होता. त्यांचे सर्व शिक्षण मुंबईच्या वडाळामध्ये पुर्ण झाले होते. शालेय शिक्षण पुर्ण करत असताना भाऊ कदम यांना अभिनयात रुची निर्माण झाली. त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

याच कालावधीमध्ये त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. भाऊ कदम यांच्या वडिलांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भाऊ कदम यांच्यावर आली. त्यांनी आपल्या कुटुंबाला सांभाळत आपली आवड देखील जपली.

भाऊ कदम यांनी अनेक नाटकांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या अभिनयाने अनेकांना प्रभावित केले. त्यांनी अनेक नाटक आणि एकांकिका केल्या. एवढंच ना, एक डाव भटाचा यांसारख्या नाटकात देखील त्यांनी काम केले.

या नाटकांमधून भाऊ कदम यांना असणारी अभिनयाची जाण सर्वांना दिसत होती. त्यांना विनोदी नट म्हणून ओळख मिळाली होती. पण त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी अभिनय सोडून पानटपरी सुरू केली. पण त्यांना अभिनयाची आवड होती.

त्यामूळे त्यांनी लवकरच अभिनयात येण्याचा निर्णय घेतला. भाऊ कदम यांना ज्यावेळी पहिल्यांदा कॅमेरासमोर अभिनय करण्यासाठी विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी नकार दिला. कारण कॅमेरासमोर असताना विनोद कसे तयार करावेत हे त्यांना कळत नव्हते.

पण आज तेच भाऊ कदम कॉमेडी किंग आहेत. त्यांनी ‘फु बाई फु’ च्या पहिल्या सीजनमध्ये सहभाग घेतला होता. पण दुसऱ्यांना मात्र त्यांनी नकार दिला. त्यांना तिसऱ्यांदा विचारण्यात आला तेव्हा देखील त्यांनी नकार दिला. कारण त्यांना कॅमेरासमोर विनोद जमत नव्हता.

पण त्यांच्या मुलीने आणि पत्नीने आग्रह केल्यानंतर त्यांनी होकार दिला. फु बाई फु मध्ये त्यांचा अभिनय आणि विनोद कौशल्य पाहून सर्वजण थक्क झाले. त्यांना अनेक कार्यक्रमांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. भाऊ कदम त्यांच्या या यशाचे सगळे श्रेय त्यांच्या कुटुंबाला देतात.

त्यांच्या कुटुंबाने त्यांना सहकार्य केले. म्हणून ते आज इथपर्यंत पोहोचू शकले असे त्यांचे म्हणणे आहे. भाऊ कदम यांच्या पत्नी त्यांच्या या प्रवासात खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. म्हणून त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबाला खुप महत्त्व आहे.

याच कालावधीमध्ये त्यांना निलेश साबळे यांनी एका कार्यक्रमाची ऑफर दिली. हा कार्यक्रम म्हणजे चित्रपटाचे प्रमोशन होते. त्यांनी या कार्यक्रमाला होकार दिला. हा कार्यक्रम खुप गजला आणि भाऊ कदम देखील खुप गाजले.

या कार्यक्रमात त्यांनी निलेश साबळे, सागर कारंडे, श्रेया बुगडे आणि भरत गणेशपुरे यांसारख्या कलाकारांसोबत काम केले. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने त्यांना घराघरात नेऊन पोहोचवले. त्यांची प्रसिद्धी खुप जास्त वाढली.

टेलिव्हिजनसोबतच त्यांना मोठ्या पडद्यावरून देखील अनेक ऑफर येत होत्या. त्यांनी अनेक मोठी नाटके केली जसे की बाजीराव मस्तानी, करून गेले गाव. नाटकांसोबतच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले.

आज भाऊ कदम महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध नाव आहे. त्यांना घरोघरी पहिले जाते. मराठीतील प्रत्येक कार्यक्रमात भाऊ कदम हमखास असतात. कारण त्यांच्या विनोदाशिवाय कोणताही कार्यक्रम पुर्ण होत नाही. त्यांनी स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

तुम्हाला माहीत नसेल पण शाहरूखने एकदा दोनदा नाही तर चक्क तीन वेळा लग्न केले आहे; वाचा पुर्ण किस्सा

दिवसभर काम करायचा आणि रात्री एकटा रडत बसायचा बॉलीवूडचा ‘हा’ सुपरस्टार

सचिनची मुलगी सारा तेंडूलकर शुभमन गिलची पत्नी? पहा कसं काय घडलं हे…

अक्षयकुमारने साखरपुड्यानंतर वाऱ्यावर सोडले होते रविनाला; स्वत: रविनानेच सांगीतली आपबिती

पतीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री मयूरी देशमुखने पहिल्यांदाच केला अनेक गोष्टींचा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.