रिकामी घरे, बंगले, हॉल, गाळे कोरोना रुग्णांसाठी द्या; अभिनेता भरत जाधवने केले आवाहन

मुंबई । देशात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आरोग्याच्या सोयी कमी पडू लागल्या आहेत. अनेकांना ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नाहीत. असे असताना मदतीसाठी आवाहन केले जात आहे. अभिनेता भरत जाधवने देखील मदत करण्याचे आवाहन केले आहे.

रिकामी घरे, बंगले, फ्लॅट्स, हॉल गाळे हे कोरोना रुग्णासांठी द्या, असे आवाहन भरत जाधव याने केले आहे. भरतच्या सोसायटीमध्ये ही संकल्पना अंमलात आणली होती. याचा फायदा झाला होता.

त्यामुळे त्याने तेच उदाहरण देत कशाप्रकारे कोरोनाबाधितांची आपण मदत करू शकतो, हे पटवून दिले आहे. सध्या अनेकांना मदतीची गरज आहे. अनेकांना उपचारासाठी बेड्स देखील उपलब्ध होत नाहीत.

भरत जाधवची ही संकल्पना अनेकांना आवडली. नेटकऱ्यांनीही त्याचे कौतुक केले. लोकांना सध्या मदतीची फार गरज असून ही संकल्पना अंमलात आणता येईल, अशी प्रतिक्रिया अनेकजण देत आहेत. हा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे, अनेकांनी या आवाहानाला प्रतिसाद द्यावा, असे सांगण्यात आले आहे.

देशात रोज तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तसेच महाराष्ट्रात देखील रोज ६० हजारांपेक्षा जास्त रूग्णसंख्या आहे. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. यामुळे येणाऱ्या काळात जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

ताज्या बातम्या

गायिका सुनिधी चौहानने आपल्या नवऱ्यासोबत सुरु असलेल्या वादावर सोडले मौन; म्हणाली…

टाटाची भन्नाट ऑफर! महिन्याला ३,५५५ रुपये भरा आणि घरी घेऊन या ‘ही’ महागडी कार

भाईजानसाठी कायपण! सलमानच्या ‘राधे’च्या प्रमोशनसाठी अभिनेत्री पीपीई किट घालून रस्त्यावर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.