पुण्याच्या वेदीकाचा मृत्यूच्या काही तासांपूर्वीचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर, पहा हृदय पिळवून टाकणारा व्हिडिओ…

पुणे । जन्मजात दुर्धर या दुर्मीळ आजाराशी लढा देणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील चिमुकल्या वेदिका शिंदेने जगाचा निरोप घेतला. वेदीकाच्या पालकांकडे उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले होते. उपचारासाठी १६ कोटी रुपयांच्या औषधाची गरज असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

त्यानंतर नेटकऱ्यांनी या पोस्टला तुफान प्रतिसाद देत तब्बल १६ कोटी रुपये जमा केले होते. वेदिका साठी अख्खा देश एकत्र आला. यामध्ये राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, समाज सेवक आणि अभिनेते यांनीही मदत करत आणखीन मदतीसाठी आव्हान केले. वर्षाची चिमुरडी किती सहन करणार? पण आई-वडिलांचा आणि देशवासियांच्या पाठिंबा मिळाल्यामुळे वेदिका पुन्हा बागडू लागेल हे स्वप्न दिसू लागले.

मात्र, दुर्देवाने हे केवळ स्वप्नचे राहिले. १ ऑगस्ट रोजी वेदिका शिंदेला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यातच तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान वेदिका शिंदेच्या आई-वडिलांनी तिच्या गोड-गोंडस फोटो आणि व्हिडीओचे एक इस्ट्राग्राम अकाऊंटही सुरू केले आहे.

वेदिकाच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्यांनी वेदिकाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये वेदिका खेळताना दिसत आहे. दुर्देवाने हा व्हिडीओ शेवटचा ठरला आहे. या व्हिडीओमध्ये वेदिका खेळताना दिसत आहे. यात लिहिले आहे की, आज बाबांनी मला एक बॉल दिला.

हा बॉल मी घट्ट पकडू शकते. हे किती भारी आहे ना, गेल्या काही दिवसात मी बरी होत आहे. तुम्हा सर्वांसोबत खेळायची आतुरतेने वाट पाहतेय. माझी आजी माझ्यावर खूप प्रेम करते. ती नेहमी माझ्यासाठी गाणे गाते आणि मला ते खूप आवडते. इतके की गाणे सुरू झाले की मी टाळ्या वाजवू लागते.

हो मी टाळ्या वाजवते, मी स्टेरॉइडवर आहे पण एक चांगली बातमी म्हणजे माझा प्रतिसाद देण्याच्या कालावधीत कमालीची सुधारणा झाली आहे. डॉक्टर म्हणाले थोडी थोडी सुधारणा आहे. पण ऑक्सिजन लेवल कमी असल्याकारणाने आणि वातावरणातील बदलामुळे मला त्रास होतो. मला सतत ताप येत राहतो. माझे आई-बाब खूप काळजी करीत राहतात.

उद्या ते मला न्यूरोलॉजिस्टकडे घेऊन जाणार आहे. व्हिडीओच्या खाली लिहिलेला हा मजकूर वाचून तुम्ही अश्रू थांबवू शकणार नाही. वेदिका आपल्यात नाही, ही बाब अद्यापही मन मानण्यास तयार नाही. वेदिकाच्या अशा जाण्यामुळे अख्ख्या देशाला धक्काच बसला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! पूजा चव्हाण प्रकरणातील ‘ते’ कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती? राठोड यांच्या अडचणीत वाढ

धक्कादायक! पुण्यातील १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या, दहावीला मिळाले होते ९५ टक्के

पत्नीच्या मृत्यूनंतर हा बाप बाळाला कडेवर घेऊन शिकवतोय, जाणून घ्या ह्दयस्पर्शी कहाणी…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.