गुरुवारी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा ताफा एका हॉटेल मालकाने अडवला होता. हॉटेलचे बिल न दिल्याचे कारण देत हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना रोखले होते. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला(Sangola)येथे हा प्रकार घडला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता.(hotel owner statement on ex minister sadabhau khot)
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणात हॉटेल मालकाविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सांगोला पोलिसांनी हॉटेल मालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. “मी २०१४ पासून मी १५ वेळा सांगोल्यात आलो आहे. मी त्या माणसाला ओळखत नाही. राष्ट्रवादीकडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली होती.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेल्या आरोपांना हॉटेलचे मालक अशोक शिनगारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “सदाभाऊ खोत हा फसवा माणूस आहे. काहीही बोलतील. आता हे जगजाहीर झाले आहे. मी संघटनेचे काम करत होतो म्हणून सदाभाऊंवर माझं प्रेम होते. शरद पवारांसारख्या माणसाला बदनाम करत आहेत मग माझ्यासारख्या माणसाला बदनाम का करू नये. ”
भाजपचा हा पेशा आहे. मी तंतोतंत आकडा सांगू शकत नाही. पण माझे ६६ हजार ४५० रुपये बिल त्यांच्याकडे आहे. त्यांनी ते द्यावं. मी खोटं बोलत असेन तर त्याची चौकशी व्हावी. सदाभाऊ हे शेतकरी चळवळीतील नेते आहेत. माझा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही. मी शेतकरी संघटनेच्या चळवळीचा कार्यकर्ता आहे.”, असे हॉटेलचे मालक अशोक शिनगारे यांनी सांगितले.
हॉटेलचे मालक अशोक शिनगारे पुढे म्हणाले की, “माझ्यावर शेतकरी आंदोलनाचे अनेक गुन्हे आहेत. याची खातरजमा सदाभाऊंनी करावी. मला स्वतःला सागर खोत भेटायला आले होते. त्यांच्या सांगण्यावरून आठ ते दहा दिवस कार्यकर्ते जेवायला हॉटेलमध्ये येत होते. मला सागर यांनी सांगितलं होतं की तुमचं बिल लाख रुपये होऊ द्या किंवा दीड लाख भरून देऊ”, असे अशोक शिनगारे यांनी सांगितले.
“माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलावर गुन्हा दाखल करून सदाभाऊ मोठे होणार असतील तर त्यांनी ते जरूर करावं. पण माझ्या हॉटेलचं थकलेलं बिल त्यांनी द्यावं. मी जमीन विकून हा व्यवसाय सुरु केला आहे. सगळ्या अधिकाऱ्यांना माझी परिस्थिती माहित आहे”, असे हॉटेलचे मालक अशोक शिनगारे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘या’ दोन खेळाडूंमुळे श्रेयस अय्यरचे भारतीय संघातील स्थान धोक्यात, होऊ शकते हकालपट्टी
कार्तिक आर्यनने ऐकली गरीब मुलांकडून भुल भुलैया २ ची कहाणी, व्हायरल होतोय मजेशीर व्हिडीओ
”सदावर्तेंसारख्या बाजारूला काय कळणार पवार साहेब, त्यासाठी चांगली दृष्टी व लायकी लागते”