गरम पाणी प्यायल्याने कोरोनापासून बचाव होतो? केंद्र सरकारने दिली वेगळीच माहिती..

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही लोक घरीच अनेक उपाय करत आहे.

काही लोक कोरोनापासून बचाव करण्यासाठी वाफ घेण्याचा किंवा गरम पाणी पिण्याचा सल्ला देत आहे. तसेच गरम पाण्याने अंघोळ केल्यास कोरोना होत नाही, असेही दावे सोशल मीडियावर लोकांनी केले आहे. पण आता यामागचे सत्य समोर आले आहे.

केंद्राने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. व्हायरल मॅसेजचे सत्य तपासले असता, हा मॅसेज खोटा असल्याचे समोर आले आहे. गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही, असे केंद्राने स्पष्टपणे सांगितले आहे.

गरम पाणी प्यायलाने किंवा अंघोळ केल्याने कोरोनापासून बचाव होत नाही. कुठल्याही ऐकवी माहितीवर विश्वास ठेऊ नये, असे केंद्र सरकारच्या माय गव्हर्नमेंट इंडिया या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन सांगण्यात आले आहे.

तसेच या व्हायरल मॅसेजबाबत पीआयबीच्या फॅक्टचेक टीमनेही याबाबत खुलासा केला आहे. सोशल मीडियावर सध्या कोरोनापासून वेगवेगळे मॅसेज व्हायरल होत आहे. अनेक घरगुती उपाय आणि औषधांचे सल्ले दिले जात आहे.

अशात आता त्या व्हायरल मॅसेजमध्ये काहीच तथ्य नसल्याचे केंद्रानेच स्पष्ट केले आहे. यात गरम पाण्याचा सल्ला खुपच व्हायरल झाला होता. त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचे सल्ले न ऐकण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

एकेकाळी स्कुटरवर सामान विकायचे दोघे मित्र, आता १ लाख करोड रूपयांना विकली गेली त्यांची कंपनी
दिग्दर्शकाने Action म्हणताच अभिनेते प्राणने किशोर कुमारच्या कानाखली वाजवली आणि…
भाजप खासदाराने ३० रुग्णवाहिका लपवून ठेवल्या होत्या घरात; असा झाला पर्दाफाश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.