लग्नानंतर पहिल्यांदाच दिया मिर्झाने शेअर केले हॉट फोटो, नवऱ्यासोबत करतेय हनीमून एन्जॉय

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा ही वैभव रेखी या बिझनेसमन मित्रासोबत 15 फेब्रूवारीला विवाह बंधनात अडकली होती. वैभव रेखीचे पहिले लग्न झालेले असून अभिनेत्री दीया मिर्झा सोबत दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. दीया आणि वैभवने हनीमून एन्जॉय करण्यासाठी मालदीव हे नयनरम्य ठिकाण निवडले आहे.

सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री दीया मिर्झा नेहमी सोशल मिडियावर फोटो, व्हिडिओ शेअर करत फॅन्सला वेड लावत असते. दियाने असाच हॉट अंदाजातील मालदिवच्या समुद्र किनाऱ्यावरील फोटो शेअर करत धुमाकूळ घातला आहे.

फोटोला कॅप्शन देत दियाने म्हटलं आहे, “हिंद महासागर येथे एका स्वर्गात आलो आहोत, मजा करत आहोत, येथे आतापर्यंतचा प्रत्येक क्षण खास आहे. दियाचे हॉट लुकमधील फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे.

दीयाचे पहिले लग्न साहिल संघासोबत झाले होते. त्यानंतर दोघे ११ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०१९ मध्ये विभक्त झाले होते. वैभव रेखी मुंबईतील बिझनेसमन आणि इन्व्हेस्टर आहे. त्याचेही पहिले लग्न झाले असून प्रसिद्ध योगा इंस्ट्रक्टर सुनैना रेखीचा नवरा होता. सुनैना आणि वैभवला एक मुलगीदेखील आहे.

अभिनेत्री दीया मिर्झाने बॉबी जासूस, कुर्बान, लक बाय चान्स, शूट आऊट एट लोखंडवाला, लगे रहो मुन्नाभाई, रहना है तेरे दिल में यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत.

दिया मिर्जाने थप्पड चित्रपटात एका घटस्फोटित महिलेची भूमिका निभावली होती. अभिनेत्री तापसी पन्नुसोबत दीयाने भूमिका साकारली होती. लवकरचं दिया तेलगू फिल्म ‘वाईल्ड डॉग’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 2 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
रात्री मला भेटायला बोलवून…; लेडी सिंघम दिपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासे
देवमाणूस! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना, आता गरीबांना देतोय फक्त १ रुपयांत उपचार
“केरळमधील लोक सुशिक्षित आहेत, म्हणून भाजपला मतदान करत नाहीत” भाजप आमदाराचे धक्कादायक वक्तव्य
देवमाणूस! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना, आता गरीबांना देतोय फक्त १ रुपयांत उपचार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.