दिल्ली | एकीकडे सारे जग कोरोनाशी लढत आहे भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. रोज रूग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. संशोधक लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे स्वघोषित शास्त्रज्ञ आपले डोके चालवत आहेत.
केंद्रातील भाजपमधील आणि मोदी सरकारमधील मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी चक्क कोरोनाशी लढणारे आणि शरीरात अँटिबॉडीज तयार करणारे पापड लॉन्च केले आहे. त्या पापडाचे नाव भाभीजी पापड आहे.
सध्या सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी दावा केला आहे की भाभीजी पापड खा आणि कोरोनाला पळवून लावा.
त्यांच्या या दाव्यामुळे मोदी सरकार अडचणीत पडू शकते. या संदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे. हा पापड आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत बनवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्यांची प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. लोक म्हणत आहेत की, जर भाभीजी पापड खाऊन कोरोना जात असेल तर कोरोना लसीची काय गरज आहे ? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.