हॉस्पिटलमध्ये तोडफोड करायला गेलेल्या भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी काठी तुटेपर्यंत चोपले; पहा व्हिडीओ

कोरोनामुळे रुग्णांचे दुःखद मृत्यू होत आहेत. त्यामुळे संतप्त झालेला जमाव हॉस्पिटलची तोडफोड करायला पण मागे पुढे पाहत नाही. अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची जालना जिल्हात घडली आहे. तिथे एका भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी खाक्या दाखवला आहे.

जालन्यामध्ये एका रुग्णांचा दुःखद मृत्यू झाला. तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलचे नुकसान केले. तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या एका भाजप कार्यकर्त्याने पण हॉस्पिटलचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपस्थित पोलिसांनी त्याला बांबूचा प्रसाद दिला आहे.

भाजप युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले असं मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. जालन्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तरुणाला दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

यावेळी उपस्थित पोलिसांनी त्या भाजप कार्यकर्त्याची चांगलीच धुलाई केली आहे. यावेळी तो पोलिसांकडे मारू नका म्हणून गयावया करत आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी त्याला मार मार मारले आहे.

पोलिसांनी चांगलाच लाठीमार केल्याचे व्हिडिओतून दिसून आले आहे. यावेळी पोलिसांसोबत शिवराज याने वाद घातल्याचे पण दिसून आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी शिवराजला हॉस्पिटलमध्येच लाठीचार्ज दिला आहे.

पोलिसांनी शिवराजला एवढे मारले आहे की त्यांच्या हातातील दोन काठ्या मोडून गेल्या आहेत. पोलीस त्याला मारत होते आणि तो त्यांच्यापुढे मला सोडा म्हणून गयावया करत होता. अखेर ज्या हॉस्पिटलमध्ये घटना घडली होती त्याच हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी शिवराजला वाचवले आहे. व्हिडिओमधून सर्व दिसून आले आहे.

ताज्या बातम्या
किस केल्यामुळे मिकासिंगला जेलची हवा खायला घालणाऱ्या राखी सावंतने आता त्यालाच मारली मिठी

वर्ल्डकप सुपर लीगमध्ये बांगलादेश अव्वल स्थानी, तर भारत पाकिस्तान, अफगाणिस्तानपेक्षा खाली..

अरे बाप रे! नेहा कक्करने मेकअप नसलेला व्हिडिओ केला शेअर; तिचा नवरा म्हणाला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.