Share

Munmun Dutta : तारक मेहता’फेम बबिताचा लैंगिक शोषणाचा भयानक अनुभव; शिक्षकांचा हात कायम माझ्या अंडरपॅंटमध्ये..

Munmun Dutta : ‘तारक मेहता उल्टा चष्मा’ फेम बबिताजीची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. मूनमून दत्ता रिलेशनशिपमध्ये असल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. पण बबिताजी डेट करत असलेल्या व्यक्तीचं नाव ऐकून सगळ्यांना धक्का बसला होता.(Tarak Mehta Ooltah Chashma, Babita, Munmun Dutta)

मूनमून मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा राज अनादक याला डेट करत असल्याच्या रंगल्या असून या दोघांबद्दल अनेक तर्क वितर्क चाहते लावत आहेत. अशातच मूनमून दत्ता हिची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. मूनमून दत्ताने आपल्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक सत्य सर्वांना सांगितलं आहे. मुनमुनने २०१७ मध्ये हा खुलासा केला होता.

तिचे काका, शिक्षक आणि चुलत भावाने तिचे लैंगिक शोषण केले होते. याविषयी सांगताना मुनमुनने एक नोट लिहिली होती, “असे काही लिहिताना त्या गोष्टींना आठवण केल्यामुळे डोळ्यातून अश्रू येतात, जेव्हा माझ्या बाजुला राहणारे काका आणि त्यांच्या नजरेची मला भीती वाटायची.

जे संधी मिळाली की मला पकडायचे आणि मला धमकवायचे की कोणालाही काहीही सांगू नकोस. माझ्यापेक्षा वयाने मोठा असलेला माझा चुलत भाऊ किंवा ज्याने मला हॉस्पिटलमध्ये जन्म झाल्यानंतर पाहिले आणि १३ वर्षांनी माझ्या शरीराला स्पर्श करणे योग्य आहे असे त्याला वाटले, कारण मी लहान होते आणि माझ्या शरीरात बदल होत होते.

माझे शिक्षक ज्याचा हात माझ्या अंडरपॅंटमध्ये होता. आणखी एक शिक्षक जो वर्गात असलेल्या मुलीच्या ब्राचा स्ट्रॅप खेचत ओरडायचा किंवा मग रेल्वे स्टेशनवरील तो व्यक्ती ज्याने तुम्हाला पकडले होते,” असे मुनमुन म्हणाली. पुढे मुनमुन म्हणाली, “का? कारण तुम्ही खूप लहान आहात आणि बोलायला घाबरत आहात.

एवढी भीती वाटते की तुम्हाला पोटात गोळा येतो आणि गुदमरल्यासारखे वाटते. तुम्हाला हे माहित नाही की तुम्ही तुमच्या पालकांना हे सगळं कसं समजावून सांगाल किंवा तुम्हाला कोणालाही एक शब्दही सांगण्याची लाज वाटते. मग तुम्हाला पुरुषांविषयी खूप राग येतो, कारण तुम्हाला माहित आहे की तुमची जी परिस्थिती आहे त्याचे गुन्हेगार ते आहेत.

त्या घाणेरड्या भावना त्या जाण्यासाठी वर्षे लागतात. मला आनंद आहे की या चळवळीत माझा आवज सामील झाला आहे आणि लोकांना याची जाणीव करून देते की त्यांनी मला ही सोडले नाही. पण, आज कोणीतरी माझ्याशी असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल, तर मी त्याला सोडणार नाही. मी कोण आहे याचा मला अभिमान आहे.” अस ती पोस्ट मध्ये म्हणाली होती.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा प्रत्येक घरातला आवडता शो आहे. हा शो 13 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या सर्व कलाकारांनी लोकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.

महत्वाच्या बातम्या
bacchu kadu : बच्चू कडू सोंगाड्या असून ते तोडपाणी करतात; फडणवीसांच्या जवळच्या मित्राचे गंभीर आरोप
shivsena : ‘हल्ले करून तुम्ही मला शांत करू शकत नाही, मी जिवंत आहे, तोपर्यंत..,’ सेनेच्या वाघाने फोडली डरकाळी
shivsena : भास्कर जाधवांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न; राजकीय लढाई घरापर्यंत पोहोचली, वाचा नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या इतर क्राईम बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now