Share

धक्कादायक! १३ फूट मगरीवर ‘या’ व्यक्तीने मारला ताव, खाल्ल तिचं ४०० किलो मांस

florida-crocodile.

मगरींचे अनेक प्रकार असतात. काही मगरी लहान असतात, तर काही मगरी प्रचंड मोठ्या असतात. मगर हा प्राणी फार धोकादायक असतो. मगरीने एखाद्यावर हल्ला केला तर त्याचा जीव वाचण्याची शक्यता फारच कमी असते. गेल्या ८० वर्षांपासून, एक महाकाय मगर फ्लोरिडाच्या ओकीचोबी काउंटीमधील तलावाच्या आत राहत होती.(horrible 13 feet long crocdile catch by man)

या मगरीने वर्षानुवर्षे गावकऱ्यांना त्रास दिला. या मगरीने काही वेळा गावातील लोकांचे पाळीव प्राणी खाल्ले. तर काही वेळा या मगरीने गावातील लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये या मगरीची दहशत पसरली होती. अखेर गावातील रहिवाशांनी या मगरीला संपवण्याचा निर्णय घेतला.

या मगरीला मारण्यासाठी गावकऱ्यांनी एका प्रोफेशनल शिकाऱ्याची मदत घेतली. गावकऱ्यांनी डॉग बोर्रीसशी संपर्क साधून त्याला या मगरीला पकडण्यास सांगितले. डॉग बोर्रीस या प्रोफेशनल शिकाऱ्याने अखेर या मोठ्या मगरीला ठार मारले. गावकऱ्यांनी या गोष्टीसाठी डॉग बोर्रीसचे यांचे आभार मानले आहेत.

डॉग बोर्रीस याने या शिकारीची माहिती देताना सांगितले की, त्याने दिवसातच या मगरीची शिकार केली. तलावामध्ये असलेल्या एका छोट्याश्या आयलँडमध्ये त्याला ही मगर दिसली. मगर दिसताच त्याने या मगरीची शिकार केली. त्याने यासाठी रायफल वापरली. ३२१ यार्ड लांबून त्याने ही गोळी चालवली.

शिकार केल्यानंतर डॉगने मगरीला हातात घेऊन तिचा आकार पाहिला. ती इतकी मोठी असावी याची कल्पना त्याने केली नव्हती. या मगरीचे वजन सुमारे ४०६ किलो होते. या मगरीची लांबी तब्बल १३ फूट लांब होती. डॉगने या मगरीच्या शिकारीचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या मगरीचे फोटो पाहून आपल्याला सुद्धा धडकी भरते.

मगरीची शिकार केल्यानंतर डॉगने मगरीचे कातडे वेगळे केले. एवढेच नाही तर मगरीचे मांस शिजवून डॉगने मेजवानी केली. त्याने या शिकारीचा पुरेपूर आनंद लुटला. डॉगने मगरीचे शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या मारण्याचा मला आनंद आहेच, पण ज्या पद्धतीने मी या मगरीची शिकार केली, त्यामुळे मला खूप छान वाटत आहे, असे डॉग बोर्रीसने सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
भन्नाट ऑफर! 1,150 रुपयांचे किंमतीचे हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन मिळणार मोफत
Tata Play देणार Jio ला टक्कर, ग्राहकांना मोफत दिले 1,150 रुपयांचे इंटरनेट कनेक्शन
लतादीदींच्या जाण्याने मोदींवर कोसळला दुःखाचा डोंगर; म्हणाले, माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now