टाईम्सच्या सन्मानाची मानकरी ठरलेली भारतीय वंशाची १५ वर्षांची मुलगी आहे तरी कोण? तिच काम अभिमानास्पद आहे!

मुंबई | टाईम मॅगझिन भन्नाट लोकांना आपल्या कव्हरवर स्थान देत असते. अनेकदा टाईमच्या कव्हरवर फोटो छापून आल्याच आपल्याला समजत. असे होते की, टाईमच्या कव्हरवर फोटो छापून आल्यावर आपल्याच देशाच्या लोकांची माहिती आपल्याला होते. यामध्ये हटके काहीतरी वेगळे प्रभावी काम असलेले लोक पाहायला मिळतात.

 

यंदाही असाच एक अनोळखी चेहरा टाईम्सच्या कव्हर वर आहे. १५ वर्षीय गीतांजली राव या भारतीय-अमेरिकन मुलीने टाइम्सच्या कव्हरवर स्थान मिळवले आहे. हॉलिवूड सुपरस्टार अँजेलीना जोलीने तिची मुलाखत घेतली आहे.

 

यावेळी, ‘सगळ्या प्रश्नावर एकाच वेळी विचार करण्यापेक्षा एका प्रश्नावर लक्ष केंद्रित करून काम करा’ असा संदेश गीतांजलीने तरुणांना दिला. तसेच “जर मी हे करू शकते तर तुम्हीही करू शकाल. मी निरीक्षण, संशोधन, संदेशवहन, विचार-चर्चा यातून काही समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असे गीतांजली मुलाखतीत सांगितले.

 

गीतांजलीची निवड कीड ऑफ द इयर म्हणून झाली आहे. जगभरातील पाच हजार उमेदवारांतून झाली आहे. गीतांजली ही पहिली ‘कीड ऑफ द इयर’ ठरली आहे.

 

एवढ्या कमी वयात तिने पाण्यातल्या शिशाचं प्रमाण ओळखण्यासाठी सेन्सर तयार केले आहे. सर्वांना स्वच्छ पाणी मिळावे असा तिचा आग्रह आहे. या सेन्सरचे नाव तिने टेथिस असे ठेवले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.