Share

Honey Trap : “एकदाच सांगतो, दम द्यायचं बंद करा, पेन ड्राईव्ह बाहेर काढा, व्हिडिओ जनतेसमोर आणा”; अजित पवारांचा विरोधकांना इशारा

Honey Trap: महाराष्ट्रातील राजकारण सध्या हनी ट्रॅप (Honey Trap) या गंभीर प्रकरणावरून ढवळून निघालं आहे. नाशिक (Nashik) ते मुंबई (Mumbai) पर्यंत या प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणात ७२ आजी-माजी अधिकारी आणि काही राजकीय नेते गुंतल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे.

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट चार मंत्र्यांचे नाव घेत गंभीर आरोप केले, तर काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी “पेन ड्राईव्ह आमच्याकडे आहे,” असा दावा करून सरकारला अडचणीत आणलं.

“दम देणं बंद करा, पुरावे आहेत तर लोकांसमोर आणा”

या सर्व घडामोडींवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “एकदाच सांगतो, दम द्यायचं बंद करा. तुमच्याकडे पेन ड्राईव्ह, व्हिडिओ असेल तर ते बाहेर काढा. लोकांसमोर आणा.”

त्यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत, नाना पटोले यांच्यावर टीका केली असून, यावर राजकारण न करता प्रत्यक्ष पुरावे सादर करावेत, असं ठाम मत व्यक्त केलं.

प्रफुल लोढा अटकेत

या प्रकरणात भाजप (BJP) नेते प्रफुल लोढा (Praful Lodha) यांना मुंबई (Mumbai) येथे अटक झाली आहे. त्यांच्या विरोधात हनी ट्रॅप व पाॅक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. याच संदर्भात संजय राऊत यांनी “यापेक्षा अधिक माहिती हवी असल्यास एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याशी संपर्क करा” असं विधान करून चर्चेला नवा आयाम दिला आहे.

हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावरही प्रतिक्रिया

हर्षल पाटील (Harshal Patil) यांच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “कोणाची बिले थकलेली आहेत याची यादी द्या. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहोत. सब-कंत्राटदाराला पैसे न मिळाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. याची चौकशी केली जाईल.”

माणिकराव कोकाटे राजीनामा प्रकरणावर स्पष्टवक्ता

माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर अजित पवार म्हणाले, “कृषीमंत्र्यांशी समोरासमोर चर्चा करणार आहे. ‘भिकारी’ असे विधान का केलं याचाही खुलासा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही एकत्रित निर्णय घेऊ.”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now