हनी सिंगच्या बायकोने त्याच्यावर केले खळबळजनक आरोप, म्हणाली, ब्राऊन रंग दे या गाण्यातील अभिनेत्रीसोबत..

मुंबई। सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नग्राफी प्रकरणानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. एकीकडे राज कुंद्रा प्रकरण गाजत असतानाच आता दुसरीकडे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय रॅपर म्हणून हनी सिंग कौटुंबिक वादामुळे चर्चेत आला आहे.

हनी सिंगच्या विरोधात पत्नी शालिनी तलवारने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्यांतर्गत हनी सिंगच्या पत्नीनं लैंगिक हिंसा, मानसिक छळ, घरगुती हिंसा आणि तिच्यासोबत आर्थिक फसवणुकीचाही आरोप केला आहे. तिनं दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात याचिका दाखल केली असून यात शालिनीनं पती हनी सिंगचे लग्नानंतरही अनेक महिलांशी शरीरसंबंध होते असा दावा केला आहे.

व आता या दाव्यामुळेच सर्वत्र खळबळ उडाली असून हनी सिंगच्या अडचणीत वाढ झाली आहे. ‘हनी सिंगचं हिट गाणं ‘ब्राऊन रंग दे’च्या शुटिंगच्या वेळी त्यानं त्याच्या महिला सहकलाकाराशी शरीरसंबंध ठेवले होते आणि जेव्हा शालिनीनं याचा जाब विचारला तेव्हा त्यानं तिला दारूची बॉटल फेकून मारली होती’ असं आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

शालिनीनं याचिकेमध्ये हनी सिंगची आई भूपिंदर कौर, वडील सरबजीत सिंग आणि बहीण स्नेहा सिंग यांच्या नावांचा समावेश करून मानसिक छळ आणि आर्थिक हिंसेचा आरोप केला आहे. शालिनी तलवारीने हनी सिंगविरुद्ध तक्रारी नोंदवल्यानंतर दिल्लीतील तीस हजारी सत्र न्यायालयाने हनी सिंगला नोटीस बजावली आहे.

या नोटीशीला २८ ऑगस्टपूर्वी उत्तर देण्याचे आदेशही न्यायालयाकडुन देण्यात आले आहे. यो यो हनी सिंग आणि शाल‍िनी यांचा विवाह २०११ रोजी दिल्लीतल्या एका गुरूद्वारामध्ये झाला होता. शाल‍िनी सोशल मीडियावर खुप कमी सक्रिय असते.
महत्वाच्या बातम्या
खतरनाक! घरात घुसली ८ फुटांची मगर, मगरीला पाहून घरातील कुटुंबियांची उडाली तारांबळ, पहा व्हिडिओ
‘तारक मेहता…’मधील सोनूचा विचित्र अवतार पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले “तू डिस्नेला जायला हवं”
‘अपना टाइम आयेगा’ गाण्यावर अंकिता लोखंडेचा अप्रतिम डान्स; पाहायला मिळतोय अभिनेत्रीचा ‘स्वॅग’
‘विमानतळ हस्तांतरणाचा ठराव कोणी मंजूर केला? ठाकरे सरकारनेच ना? मग आंदोलन कशाला?’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.