पित्ताची गोळी खाण्याआधी करा हा सोपा घरघुती उपाय; पित्त कायमचे गायब होईल

अपूर्ण झोप, अवेळी जेवण, धावपळ अश्या अनेक कारणांमुळे बऱ्याच जणांना आम्ल पित्ताचा त्रास होतो. पित्ताचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. तसेच प्रत्येक व्यक्तीला पित्ताचा त्रास वेगवेगळ्या पद्धतीने होवू शकतो.

एखाद्या पदार्थाचे अतिसेवन केले असता पित्ताचा त्रास उद्भवू शकतो. पित्त कशामुळे झाले आहे जाणून घेण्याची सोप्पी पद्धत आहे. ज्यावेळी आपल्याला पित्ताचा त्रास जाणवू लागतो त्यावेळेच्या आधी दोन-तीन तास आपण काय खाल्ल आहे, त्यावरून आपल्याला समजू शकते की कोणत्या पदार्थामुळे पित्त झाले आहे  आणि असे पदार्थ आपण टाळू शकतो.

आम्लपित्त होण्याची बरीच कारणे आपल्याला माहित आहेत. त्यातील महत्वाच कारण म्हणजे जागरण किवा अपूर्ण झोप. जागरण झाल्यामुळे पित्ताचा त्रास वाढतो. त्याचप्रमाणे मसालेदार पदार्थ, आंबट, तेलकट, आणि एखाद्या गोष्टीच व्यसन यामुळेदेखील आम्लपित्त होवू शकते.

जेवनामधील अनियमितता आणि जेवनामधील अंतर कमी यामुळे पचनक्रिया बिघडते. आपण अतिरिक्त केलेल्या अन्नाच्या सेवनामुळे ते अन्न पचायला जड जाते. त्यामुळे छातीत जळजळ होणे आणि उलटी होणे यांसारखे त्रास उद्भवतात.

शरीरातील अनावश्यक अन्न उलटीमार्फत बाहेर पडते, त्यामुळे थोडे कमी जेवण जेवणे फायदेशीर ठरते. तसेच आठवड्यातून २-३ दिवस हलके अन्न खाणे गरजेचे आहे. आहारात तूप घालून वरणभात खाणे फायदेशीर ठरते. तूप हे पित्तनाशक आहे त्यामुळे त्याचा आम्लपित्ताम्ध्ये  उपयोग होतो.

आज आपण आम्लपित्तापासून सुटका करून घेण्यासाठी घरघुती उपाय पाहणार आहोत. हा घरघुती उपाय म्हणजे दूध. अनेकांना वाटते की दूध पिल्याने पित्त वाढते परंतु दूध जर वेगळ्या पद्धतीने घेतले तर पित्त नाहीसे देखील होते.

आम्लपित्त नाहीसे करण्यासाठी एक ग्लास दूध व त्यामध्ये बिना केमिकल गुळाचे २/३ घडे टाकावे. दुधात गुळ पूर्णपणे विरघळल्यावर रात्री झोपण्यापूर्वी हे दूध प्यावे. असे तीन दिवस केल्यानंतर पित्त नाहीसे होते, आणि त्यापासून होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते.

दुधामध्ये बरेच गुणधर्म असतात, तसेच दुधामुळे बौद्धिक पातळी वाढते. रक्तवाढ होण्यास मदत होते. आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. त्यामुळे दुधाचा आपल्या आहरात समावेश असणे गरजेचे आहे.

तर गुळामध्ये लोह आणि दुधामध्ये कॅल्शिअम असल्यामुळे स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. गुळामुळे पचनक्रिया सुलभरीत्या होते आणि पोटाचे त्रास कमी होतात.

टीप- कृपया आपल्याजवळील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हे ही वाचा-

जगाची जिरवण्याच्या नादात चीनचीच जिरणार? या प्रकरणामुळे लाखो लोकांना मृत्यूचा धोका

एका स्वप्नामूळे झाली होती अभिनेत्रीची हत्या; तीन दिवस मृतदेह घरात सडत होता

जाणून घ्या दिशा पटानीच्या लव्ह स्टोरीबद्दल; टायगरच्या अगोदर टेलिव्हिजन अभिनेत्याला करत होती डेट

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.