डोक दुखत असेल तर हे भन्नाट घरगुती उपाय करा; डोकेदुखी कुठल्या कुठे पळून जाईल

आजकाल आपल्या सर्वांना डोकेदुखीचा मोठ्या प्रमाणावर होतो. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच डोकेदुखीचा त्रास आहे. कारण आपलं जीवन खुप धावपळीचे झाले आहे. या धावपळीच्या जीवनात आपण आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाही.

अनेक वेळा खुप जास्त धावपळ झाली तर आपल्याला तणाव जाणवतो आणि डोके दुखते. काही जणांना खुप जास्त टेन्शन घेण्याची सवय असते. टेन्शन घेतल्यामुळे देखील खुप लोकांना डोकेदुखीचा त्रास होतो.

ही समस्या अनेकांना जाणवते. म्हणून आपण डॉक्टरकडे जातो. डोकेदुखीसाठी अनेक प्रकारचे औषध घेतो. अनेक वेळ आपण खुप जास्त औषधे घेतो. ही गोष्ट देखील अतिशय वाईट आहे. कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात व्हायला नको.

म्हणून आज आम्ही तुम्हाला डोकेदुखीवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायाने तुमच्या डोक्याचा त्रास कमी होऊ शकतो. तुम्हाला डॉक्टरची गरज भासणार नाही. जाणून घेऊया डोखेदुखीवर घरगुती उपाय.

आपल्या सर्वांच्या घरात जेवण बनवण्यासाठी आलं वापरले जाते. हेच आलं आपली डोकेदुखी कमी करू शकते. त्यासाठी तुम्हाला आल्याचा रस आणि लिंबाचा रस प्रमाणात मिसळून दिवसातून दोन वेळेस घ्याकिंवा आल्याच्या वड्या खा. याने तुमच्या डोक्याला चांगलाच अराम मिळेल

आल्यासोबतच आपण जेवणात दालचिनीचा वापर करतो. दालचिनीची बारीक पावडर तयार करून ठेवा. हे पावडर पाण्यात मिसळा आणि हा डोक्यावर लावा. हा लेप लावून तुम्ही ३० मिनिटे झोपा. याने तुमची डोकेदुखी गायब होईल आणि चांगली झोपही लागेल.

लवंगसुद्धा आपल्या कामाला येते. तुमचे डोके दुखत असेल आणि तुमच्याकडे काहीच उपलब्ध नसेल. तर मग दोन तीन तव्यावर गरम करून घ्या. ह्या गरम केलेल्या लवंगा एका रुमालात बांधा. जेव्हा जेव्हा तुमचे डोके दुखत असेल तेव्हा याचा वास घ्या. तुमची डोकेदुखी थांबेल.

तुळस खुप बहुगुणी असते. आपल्या सर्वांना माहितीच आहे. म्हणून अनेक जण चहात तुळस टाकून पिणे पसंत करतात. चहाऐवजी तुम्ही तुळशीचे पाने साध्य पाण्यात उकळा आणि तो काढा प्या. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

चहा हा सर्वांना आवडतो. त्यामूळे डोकेदुखीवर पण अनेकजण चहा पितात. तुम्ही साध्या दुधाच्या चहाच्या जागी काळीमिरी आणि पुदिन्याचा चहा घ्या. या चहाने तुम्हाला लगेच अराम मिळेल. म्हणून असा चहा रोज घ्यायला हवा.

तुम्ही तुमच्या डोकेदुखीवर हे घरगुती उपाय करून बघा. तुम्हाला नक्कीच अराम मिळेल. तुम्हाला या पुढे डोकेदुखीवर जास्त औषधे घेण्याची गरज नाही. या सर्व गोष्टी तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

अमृतापेक्षा कमी नाही देशी गाईचे दूध; मेंदू व पोटाच्या विकारांवर तर रामबाण; जाणून घ्या फायदे

‘त्या’ घटनेनंतर पानाला चूना लावनारा भाऊ कदम अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनला

गुळ, फुटाणे खाण्याचे फायदे ऐकाल तर थक्क व्हाल; पुरूषांसाठी तर लई भारी

नवरात्रीचे नऊ दिवस उपवासात ‘हा’ आहार घ्या आणि वाढवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती

सर्वांची पोल खोलणाऱ्या करण जोहरला सलमान खानने त्याच्या पहिल्याच चित्रपटात रडवले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.