घरच्या घरी बनवा १० रूपयांत ५० रुपयांचा हँडवॉश

अंघोळीचा साबण वापरुन छोटा होतो. या साबणाचे छोटे-छोटे तुकडे झाल्यानंतर हे फेकून दिले जातात. परंतु तुम्ही साबणाचे हे छोटे-छोटे तुकडे फेकून न देता यापासून हँडवॉश तयार करू शकता.अशाच हँडवॉशची मार्केटमधील किंमत जवळपास १०० रुपये एवढी असते. उलट हे हँडवॉश आंघोळीच्‍या साबणापासून बनवण्‍यात आल्‍यामुळे याची गुणवत्‍ताही अतिशय चांगली असते.

यासाठी तुम्ही वेगळे काहीच करण्याची गरज नाही. फक्त साबणाचे तुकडे लागतील. या साबणांच्या तुकड्यांपासून तुम्ही मार्केटमध्ये ५० रुपयांना मिळणाऱ्या हँडवॉश एवढे हँडवॉश घरीच तयार करू शकता.

साबणाच्या तुकड्यांसोबतच तुम्हाला मिक्सर, एक ग्लास गरम पाणी आणि थोडसं डेटॉल लागेल. या सर्व गोष्टींपासून तुम्ही 500ml पेक्षा जास्त हँडवॉश तयार करू शकता. याची क्वालिटीही उत्तम राहते.

साबणांच्या तुकड्यापासून हँडवॉश बनवण्यासाठी स्वच्छ पाण्याची गरज आहे. शक्य असल्यास वॉटर प्युरीफायर मधून पाणी घेऊ शकता. नसेल तर पाणी उकळवून घ्या आणि मग ते थंड होऊ द्या. यामुळे पाण्यातील जंतू मारून पाणी निर्जंतुक आणि स्वच्छ होईल.

साबणाचे उरलेले तुकडे एकत्र करा. हे तुकडे मिक्सर मध्ये वाटून घ्या किंवा हाताने कुटून घ्या. पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळून लागेल तेव्हा गॅस बंद करा आणि आता यात वाटून घेतलेली साबणाच्या तुकड्यांची पेस्ट टाका.

पाण्यात साबणाची पेस्ट टाकताना ते सतत ढवळत राहा. १५ ते २० मिनिटे हे मिश्रण ढवळत राहा नंतर हे मिश्रण थंड व्हायला ठेवा. त्यानंतर यात थोडेसे डेटॉल टाका. २४ तास हे मिश्रण असेच ठेवा. त्यानंतर हँडवॉश पाण्यात टाकून त्याचा वापर करण्यास सुरुवात करा.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.