दाताला लागलेली कीड आणि वेदना नष्ट करण्यासाठी घरगुती उपाय

जर जीवनाचा आनंद घ्यायाचा असेल तर पैसे महत्वाचा आहेच पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आपले आरोग्य आहे. जर आरोग्यच व्यवस्थित नसेल तर पैशांचा काय फायदा. शरीराचा प्रत्येक भाग तंदुरुस्त असला पाहिजे. जे दातांचेच बोलायचे झाले तर आपले दात सुरक्षित असणे खूप गरजेचे आहे.

बऱ्याच जणांना दातातील कीड किंवा दातातील वेदनांचा त्रास असतो. त्यामुळे ते लोक आपल्या आवडीचे पदार्थ खाऊ शकत नाहीत. शक्यतो ते टाळतात. दातदुखीमुळे आपल्या दैनंदिन कामात आपले लक्ष लागत नाही. कारण त्या वेदना असह्य असतात.

वेदनांतून सुटका होण्यासाठी काही लोक पेनकिलर खातात. पण हा झाला तात्पुरता उपाय. त्यामुळे दातातील कीड मरत नाही फक्त वेदना नाहीशा होतात. त्या वेदना काही दिवसांनी पुन्हा येतात. त्या वेदना घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.

जर तुमचा थोडासा दात दुखत असेल तर एक तुळशीचे पान घ्या, आणि पूजेला वापरायचे कापूर घ्या. मग तुळशीचे पान आणि कापूर घेऊन दोघांचा चुरा करा. ते दोन्ही एकत्र करून त्याचा एक छोटासा लाडू तयार करा. लाडू एवढाच करा जो तुमच्या दातात बसेल. मग तो लाडू जिथे दुखत आहे त्या दातात ठेवा. दातदुखीचा लवकर आराम मिळेल.

लवंगतेल हा उत्तम उपाय आहे. जिथे दातात दुखत असेल किंवा कीड लागली असेल तिथे तुम्ही लवंगतेल लावू शकता. त्यासाठी कापसावर लवंगतेल शिंपडा आणि कापूस दातात ठेवा. लवंगतेलाएवजी तुम्ही त्याची पावडरसुद्धा वापरू शकता. या उपायाने तुम्हाला लगेच दातांना अराम मिळेल.

अजून एक उपाय म्हणजे अर्धा चमचा तुरटी घ्या. मोहरीच्या तेल थोडे कोमट करून त्यात तुरटी पाऊडर मिसळा व एक पेस्ट तयार करा. ती कीड लागलेल्या दाताला चोळा. त्यामुळे किडही जाईल आणि दातांना वेदना होणार नाहीत. याचा सतत प्रयोग करत राहा.

आले खूप आरोग्यदायी असते. आल्याचे अनेक फायदे आहेत. दात दुखत असल्यास आल्याचा लहान तुकडा चघळत राहा आणि जो रस निघेल ती दातावर लावण्याचा प्रयत्न करा. आल्याच्या रसामुळे जंतू मरून जातील. हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा करा.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.