काळे डाग, वांग यापासून त्रस्त असाल तर करा ‘ह्या’ उपाय योजना, चमकदार आणि आकर्षक दिसेल चेहरा

सगळेचजण आपला चेहरा तसेच त्वचा चमकदार ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात आणि का नाही सुंदर दिसणं कोणाला नाही आवडत? सुंदर दिसण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करत असतात. तसेच अनेकांना आपण सुंदर दिसूच शकत नाही असा न्यूनगंड असतो.

सुंदरतेचे मोजमाप रंगा-रूपावरून करण्यापेक्षा त्वचा किती निरोगी आहे त्यावरून केले तर अधिक योग्य ठरेल. सुंदर दिसणे म्हणजे काय तर सुंदर त्वचा असणे, त्वचा निरोगी राखणे आणि योग्य पद्धतीच्या उपाय योजना करण. आज आपण अश्याच एका टिप्स बद्दल जाणून घेणार आहोत.

दिवसाची सुरुवात जर एनर्जीमय झाली अर्थात जबरदस्त ऊर्जेने झाली तर दिवसभर तुमची त्वचा सुर्याप्रणाने तेजस्वी राहते. सकाळच्या उठल्यानंतर प्रत्येकाने दिवसाची सुरवात हेल्दी आणि रिफ्रेशिंग ड्रिंक सह करावी. ज्यामुळे बॉडी आणि ब्रेन दोन्ही रिचार्ज राहतील.

चला तर मग हे हेल्दी ड्रिंक बनवण्याची पद्धत जाणून घेऊ. एक ग्लास पाणी घेऊन गरम करा. आता या पाण्यामध्ये ३ चमचे साखर आणि १/४ चमचे मीठ टाका. जेव्हा पाणी उकळू लागेल तेव्हा गॅस बंद करा आणि मग हे पाणी गाळून घ्या. आता हे पाणी घोट घोटभर चहा सारखे प्या.

सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्या हातानी चेहऱ्यावर मसाज करा. असे करणे खूप लाभदायी ठरते कारण रात्री तुमच्या स्कीन द्वारा निर्माण झालेले नैसर्गिक तेल त्वचेवर येते. त्यामुळे स्कीन सेल्सचा मसाज केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

यानंतर एलोवेरा जेलने तयार केलेल्या आईस क्यूबने चेहऱ्यावर ४ते ५ मिनिटे मसाज करा. एलोवेरा जेलचे महत्व आपण सर्वच जाणत आहोत. या क्युब्स बनवन अगदी सोप्प आहे. २ चमचे एलोवेरा जेल घ्या आणि २ चमचे गुलाबजल घ्या. या दोन्ही गोष्टी मिक्स करून आईस ट्रे मध्ये रात्रीच्या वेळी जमा होण्यासाठी ठेवून द्या. जेणेकरून सकाळी उठल्या उठल्या तुम्ही त्यांचा वापर करू शकतो.

अनेकांना आईस क्यूब वापरण आवडत नाही अश्या लोकांसाठी आजून एक घरघुती सोप्पी पद्धत सांगणार आहोत. बदाम तेलाचे ४ ते ५ थेंब घेऊन चेहऱ्यावर आणि मानेवर ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. हा मसाज करण्याआधी आपला चेहरा ताज्या पाण्याने स्वच्छ करायला विसरू नका. चेहरा अधिक तेलकट वाटत असेल तर फेसवॉशचा वापर करू शकता.

आजकाल सुगर म्हणजेच मधुमेहाची समस्या अनेकांमध्ये पाहायला मिळते. अश्या लोकांसाठी उपाय म्हणजे ग्रीन टी किंवा ब्लॅक टीचे सेवन करू शकता. मात्र हे ड्रिंक घेताना विसरू नका की यात साखर किंवा मध मिसळायचे नाही. बाकी तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे इतर आहार घेऊ शकता. तर मंडळी अशाप्रकारे कोणीही आपली त्वचा निरोगी राखू अधिक सुंदर दिसू शकतो.

हे ही वाचा-

चंपकलाल रोल नाकारून मिळाला जेठालाल रोल; वाचा कसे पोहचले जेठालाल घरोघरी

इंडिअन आयडल १२ षण्मुख प्रियासह तिच्या आईचे ट्रोलसला धडधडीत उत्तर, मायकल जाक्सनच उदाहरण देत म्हणाल्या..

स्मार्टफोनच्या किंमतीत मिळत आहेत हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना; किंमत फक्त

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.