जेवणानंतर ‘हा’ घरघुती उपाय करा, कधीच गॅस आणि पित्त होणार नाही

आजकाल अनेकांना पोटासबंधीचे त्रास वारंवार जाणवत असतात. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जसे की पोटात गॅस होत असेल, अपचनाचा त्रास असेल, पोट वारंवार गच होत असेल, पोटात वारंवार गॅस होऊन पोट फुगीर होत असेल, पोटात दुखल्या सारखे वाटत असेल अश्या अनेक गोष्टींचा समावेश असतो.

आज आपण असाच एक घरघुती उपाय पाहणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा ओवा आणि दुसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे काळे मीठ. एक चमचा ओवा आणि बारीक केलेले काळे मीठ आपल्याला यांचे एकत्रित सेवन करायचे आहे.

जेवन केल्यानंतर थोडेसे काळे मीठ आणि एक चमचा ओवा यांना एकत्र करून त्याचे सेवन करावे. हा उपाय केला तर तुमची पोट दुखीची समस्या ३ दिवसात कमी होईल. सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस हा उपाय करावा.

सकाळी हा उपाय उपाशी पोटी करावा आणि रात्री जेवण झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे. हे मिश्रण खाल्यानंतर साधारणपणे १० मिनिटांनी आपल्याला कोमट पाणी प्यायचे आहे. हा उपाय पोट फुगीचा, पोटामध्ये वारंवार गॅस होणे, अपचन, या आणि अशा सर्व पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय ठरेल.

तसेच पित्ताचा त्रासही वारंवार जाणवत असतो. अवेळी जेवण, प्रवास अश्या अनेक कारणांनी हा त्रास होत असतो. हा त्रास कमी करण्यासाठी अत्यंत साधा आणि कुठेही सोबत घेऊन जावू शकतो असा पाय आज तुम्हाला सांगणार आहोत.

आपण जे काळे मीठ आणि ओवा यांचे मिश्रण केलेलं आहे त्या मध्येच आपल्याला सुंठ पावडर टाकायची आहे. एक चमचा सुंठ पावडर आपल्याला या मिश्रणात टाकायची आहे. ज्यांना फक्त पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. हा उपाय सकाळी उपाशी पोटी करायचा आहे.

हे ही वाचा-

बाबो! गुजरातचं आकाश अचानक उजळल्यानं घबराट,एलियन असल्याचा लोकांचा अंदाज

धक्कादायक! पत्नीने भरपंचायतमध्ये पतीला मारली गोळी; कारण वाचून बसेल धक्का

बाबो! गुजरातचं आकाश अचानक उजळल्यानं घबराट,एलियन असल्याचा लोकांचा अंदाज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.