खाजवत बसु नका! ‘हा’ घरगुती उपाय करून मिळवा खाज, खरूज, गजकर्णपासून सुटका

मुंबई | अनेकांना त्वचाशी संबंधीत रोगांचा सामना करावा लागत आहे. खाज, खरुज, गजकर्ण, नायटा यांसारख्या समस्या आहेत. हे त्वचारोग एकदा झाल्यास सहजासहजी बरे होत नाहीत. यामुळे अनेक लोक यामुळे हैराण झाले आहेत. परंतु योग्य वेळी काळजी घेतली तर यापासून कायमची सुटका मिळवता येईल.

गजकर्ण आणि खाज ही सतत ओलसर राहणाऱ्या ठिकाणी जास्त प्रमाणात येते. पोट मान, पायाच्या काही भागात, जांघेत किंवा सतत झाकलेल्या जागी येते. तसेच दगडफुलासारखा दिसणारा आणि गोलाकार पसरणारा चट्टा येतो. त्याठिकाणची त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते.

सर्वप्रथम अशाप्रकारचे आजार का होतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे. बुरशीमुळे होणारा हे आजार आहेत. मुख्य म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची कमतरता, ओली कपडे घातल्याने, दुसऱ्याचे कपडे वापरण्यात आल्याने या त्वचेंच्या आजाराची सुरुवात होते.

या त्वचेच्या रोगाला दुर्लक्ष केल्याने याचे स्वरुप गंभीर होते. त्यामुळे याच्यावर वेळीच उपचार घेणं गरजेचे आहे. वेळेत उपचार हा या आजारापासून मुक्त होण्याचा मार्ग आहे. त्यासाठी याची लक्षणं काय आहेत हे माहित असायला हवे. आजार कंबर, पोट, मांड्या, जांघा इत्यादी भागात जास्त वेगाने पसतरतो. त्याठिकाणी खूप खाज सुटते तसेच चट्टा पडून त्या चट्ट्याची वाढ झपाट्याने होते.

अनेक लोक यावर उपाय शोधत आहेत. तर यावरील सर्व उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे. आयुर्वेदातील उपचार घरगुती उपाय यावर डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

गजकर्ण आणि नायटा बरे होण्यासाठी त्वचा कोरडी आणि स्वच्छ कशी राहिल याची काळजी घेतली पाहिजे. खाजेचा तो भाग स्वच्छ धुतलेला असवा. या आजारापासून आराम मिळावा यासाठी झेंडूचे फूल खूप फायदेशीर आहे. कारण झेंडूमध्ये अनेक अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे खाज, खरुज, गजकर्ण सारख्या समस्या मुळापासून नष्ट होण्यास मदत होते.

झंडूची पाने गरम पाण्यात उकळवून नंतर ते थंड पाणी खाजेच्या ठिकाणी लावावे. तसेच झंडूच्या फुले कुटून त्यांची पेस्ट आणि लेप खाजेच्या भागात लावा. तो चांगल्या प्रकारे सुखल्यानंतर थंड पाण्याने धुऊन काढा. दररोज हा नित्यक्रम केल्याने खाज, खरुज गजकर्ण निघून जाईल. हा घरगुती उपाय सहज आणि सोपा आहे. तुम्ही तो करु शकता.

महत्वाच्या बातम्या-
हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे; संभाजी भिडे यांचे मोठे वक्तव्य
“विराट नाही, अजिंक्य रहाणेनेच कसोटी संघाचे नेतृत्व करावे”; माजी क्रिकेटपटूची मागणी
काय म्हणावे आता ह्याला! एक दोन नाही तर इतक्या मुलांना सायकलवर बसवून नेत होता बहाद्दर; पहा व्हिडिओ
हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे; संभाजी भिडे यांचे मोठे वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.