अमित शहा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पुढच्या काही तासांत शेतकऱ्यांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई

नवी दिल्ली | दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांनी मंगळवारी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामुळे राजधानीत तणावाचे वातणरण निर्माण झाले आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतीत मोठा हिंसाचार झाला. याप्रकरणी कारवाई करण्यासाठी गृह मंत्रालयाने पावलं टाकली आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचं राजधानीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. संयमी शेतकरी मंगळवारी खूप आक्रमक झाल्याचे दिसून आले. यामध्ये जो हिंसाचार झाला यावर आता कठोर कारवाई करण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांसह शेजारील राज्यांच्या पोलिसांना आदेश दिले आहेत. यासाठी आज (बुधवारी) विशेष पथक स्थापन केले जाणार आहे.

शेतकरी दिल्ली-एनसीआरमध्ये आंदोलन करत आहेत. पुढच्या काही तासांत शेतकऱ्यांना आंदोलन करत असलेल्या जागा सोडाव्या लागतील अशी माहिती समोर येत आहे. याबद्दलचे आदेश गृहमंत्रालय काढू शकते. तसेच शेतकऱ्यांना आंदोलनस्थळं रिकामी करावी लागणार आहेत. तसे न झाल्यास संबंधित शेतकऱ्यांवर कारवाई होऊ शकते.

दिल्ली आणि लाल किल्ल्याच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच हरयाणा आणि उत्तर प्रदेश राज्यांच्या काही भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. आता शेतकरी आंदोलक आणि शेतकरी नेते काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेच आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काढलेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीमध्ये शेतकरी आणि पोलीस जवान यांच्यात मोठी झटापट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या घटनेमुळे राजधानीत तणावाचे वातवरण पसरले आहे. दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले आहेत. तसेच ठिकठिकाणी वाहनांची तोडफोड केली. शेतकरी एवढचं करुन थांबले नाहीत. तर त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला. तेथील खांबावर आपला झेंडा फडकवला आहे.

तसेच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवले आहेत. तसेच त्यांच्यावर लाठ्या काठ्या आणि तलवारी यांनी हल्ला चढवला आहे. यामध्ये ३०० पोलीस कर्मचारी आणि निमलष्करी दलाचे जवान जखमी झाले आहेत. तर दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक शेतकरी जखमी झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
शेतकरी आंदोलकांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फडकवला; व्हायरल मेसेज खोटा
शेतकऱ्यांपासून जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरुन मारल्या उड्या, पहा धक्कादायक व्हिडीओ
‘जर आंदोलन चिरडले तर त्याचे परिणाम गंभीर होतील’; शरद पवारांचा मोदी सरकारला थेट इशारा
जंगलात मिळाली सगळ्यात दुर्मिळ मांजर, एक डोळा निळा तर एक पिवळा; किंमत वाचून अवाक व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.