बारामतीला रोज नोटा पोहच करेल असा गृहमंत्री शरद पवार शोधतात’

बारामती । भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कधी ते शरद पवार यांच्यावर टीका करताना तर कधी अजित पवार यांच्यावर टीका करताना. आता देखील गृहमंत्री पदावरून त्यांनी निशाणा साधला आहे. यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

ते म्हणाले की, रोज बारामतीला नोटा पोहच करेल असा गृहमंत्री शरद पवार शोधतात, यामुळे आता त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आणि शरद पवारांनी पुतण्याला उपमुख्यमंत्री केले. राष्ट्रवादीला नेहमी सत्तेत गृह मंत्रालय पाहिजे असतं.

मग शरद पवारांनी अनिल देशमुखांना शोधले, त्यांचे कधी नाव ऐकले होते का?, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला होता. अशी टीका बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केली आहे. ते जुन्नरमध्ये झालेल्या सभेत बोलत होते.

हा पक्ष कधीही विसर्जित होऊ शकतो, राष्ट्रवादी हा पक्ष जादा दिवस टिकणारा पक्ष नाही. असेही पडळकरांनी म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पडळकरांनी कोरोनावरून देखील शरद पवारांवर जोरदार टीका केली होती.

ते म्हणाले, गाजराची पुंगी वाजली तर वाजली अन्यथा मोडून खाल्ली अशी दयनीय अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे. असा घणाघातही गोपीचंद पडळकर यांनी यावेळी बोलताना केला. आता राष्ट्रवादी कडून काय उत्तर मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

पैसे खूप खर्च होत आहेत? जाणून घ्या, पैसे वाचवण्याचे सोपे मार्ग…

बदला घेतलाच! कार्तिक आर्यनने करण जोहरच्या नाकावर टिच्चून एकाचवेळी मिळवले तीन मोठे चित्रपट

‘माझ्या जीवाला धोका, रुपालीताई मला घेवून चला’; वर्ध्याच्या भाजप खासदाराच्या सुनेची विनवणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.