गृहखातं एकनाथ शिंदे यांचं बंड मोडणार? महाराष्ट्र पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे(Shivsena) आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने सकाळी अकोला शहरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.(Home Department to break Eknath Shinde’s revolt? Maharashtra Police took a big step)

आपल्या पतीचे अपहरण करण्यात आले आहे, अशी तक्रार शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली होती. ‘नितीन देशमुख यांनी काल रात्री मला फोन केला होता. त्यांनी मला अकोल्याला परत येणार असल्याचे सांगितले होते, पण ते परत आले नाहीत’, असे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने तक्रारीत म्हंटले होते.

गृहखात्याने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र पोलिसांचं एक पथक सुरतला पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती.

आतापर्यंत शिवसेनेच्या ९ आमदारांच्या कुटूंबियांनी तक्रारी केल्याचे सांगितले जात आहे. या आमदारांना परत आणण्यासाठी गृहखात्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊत या प्रकरणावर म्हणाले की, “अनेक आमदारांच्या कुटुंबियांनी तक्रार केली आहे. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने तक्रार केली आहे की जबरदस्तीने त्यांचं अपहरण करून त्यांना सुरतला नेण्यात आलं आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे.”

शिवसेना नेते संजय राऊत या प्रकरणावर म्हणाले की, “आतापर्यंत अशा ९ आमदारांच्या कुटूंबियांनी तक्रारी केल्या आहेत. या गोष्टी अशाच चालू राहिल्या तर मुंबई पोलिसांना यासंदर्भात कठोर कारवाई करावी लागेल”, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

“मध्यप्रदेश, राजस्थान यांच्यापाठोपाठ भाजपने महाराष्ट्रात गुजरातच्या भूमीवरून जे ऑपरेशन ‘लोटस’ सुरु केले आहे. त्याचा आम्ही सामना करू. हे सर्व भाजपचं षडयंत्र आहे. एकनाथ शिंदें यांचं गैरसमज आम्ही लवकरच दूर करू. आमचे दोन लोक त्या ठिकाणी गेले आहेत. ते आमदारांसोबत चर्चा करणार आहेत”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना आमदाराला हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल
बंडखोर एकनाथ शिंदेंना दिघे कुटुंबीयांनी सुनावले; आनंद दिघेंनी गद्दारी सहन केलीच नसती..
“एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये जावे एवढी भाजपची लायकी नाही”