फेकून दिलेल्या काचेच्या बाटल्यांपासून डेकोरेशनचे सामान बनवून कमवते लाखो; तुम्हीही शिका

भारतात मोठ्या प्रमाणावर काचेचे उत्पादन केले जाते. काच ही पुर्णपणे पुनर्वापरयोग्य आहे. पण तरीही काचेचा पुनर्वापर वापर केला जात नाही. फक्त ४५% ट्क्के काचेचा पुर्नर्वापर केला जातो. त्यामूळे ५५% टक्के काचेच्या वस्तू कचऱ्यात फेकल्या जातात.

भारतात नदीत, रस्त्याच्या कडेला किंवा अजून अनेक ठिकाणी काचेच्या वस्तू पडलेल्या दिसतात. यामूळे आपल्या पर्यावरणाचे खुप जास्त नुकसान होते. आपल्याला या गोष्टीचा विचार केला पाहिजे. याचे उत्तम उदाहरण आहे केलळमधील 24 वर्षीय अपर्णा.

अपर्णा बीए पास आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून अपर्णा फेकलेल्या काचेच्या बॉटलींपासून अणोखे आणि सुंदर होम डेकोरचे प्रोडक्ट बनवत आहे. ती प्रत्येक क्राफ्टसाठी जुन्या आणि लोकांनी फेकून दिलेल्या काचेच्या बॉटलचा वापर करते.

अपर्णाला टाकावू गोष्टींपासून टिकावू गोष्टी बनवायला खुप जास्त आवडतात. याबद्दल अपर्णा म्हणाली की, ‘माझी आई हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. पण तिला घर सजवायला खुप आवडते. मी लहानपणापासून तिला आर्ट आणि एंड क्राफ्ट करताना पाहीले आहे. त्यामूळे मला देखील या गोष्टींमध्ये रुची निर्माण झाली. त्यामूळे मी अनेक गोष्टी बनवण्यास सुरुवात केली’.

अपर्णाने आवड म्हणून आर्ट आणि क्राफ्टची सुरुवात केली होती. पण नंतर तिला अनेक ऑर्डर मिळू लागल्या. तिने तिच्या आवडीचे रुपांतर व्यवसायात केले. अपर्णाने लोकांनी फेकून दिलेल्ला काचेच्या बॉटल्या जमा करायला सुरुवात केली.

ती त्या बॉटलींपासून अनेक सुंदर होम डेकोरेशनचे प्रोडक्ट बनवते. तिला अनेक ऑर्डर येतात. अपर्णा केरळमधील कोल्लमपासून काही अंतरावर असणाऱ्या मन्नोतुरुत्तूमध्ये राहते. हे एक टुरिस्ट प्लेस आहे.

तिला तिच्या शाळेसाठी रोज कोल्लमला जावे लागायचे. शाळेतून परत येताना ती रस्त्यावर पडलेल्या अनेक काचेच्या बॉटल घरी घेउन यायची. ती त्या बॉटल साफ करुन त्यापासून काहीतरी नवीन बनवायची.

२०१७ मध्ये अपर्णाने या गोष्टीची सुरुवात केली होती. तिने सांगितले की, नवनवीन क्राफ्टच्या आयडीयांसाठी ती रिसर्च करत असते. त्यावेळी तिला समजले की, टाकावू गोष्टींपासून टिकावू गोष्टी केल्यामूळे पर्यावरणाला फायदा होतो. हे समजल्यानंतर तिने अनेक नवीन गोष्टी बनवण्यास सुरुवात केली.

अपर्णाने सांगितले की, ‘त्यांच्याकडे अष्टमूडी नदी खुप प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक तिथे येतात. पण त्या नदीच्या एका पात्रात कचरा जमा झाला होता. यामूळे नदीची सुंदरता कमी झाली होती. मी या नदीला साफ करण्याचा निर्णय केला. या नदीत जे सामान मिळेल त्याचा पुर्नवापर करायचा असे मी ठरवले’.

२०१९ मध्ये मी माझ्या फेसबूक आकाउंटवर या गोष्टीची माहीती दिली. त्यावेळी अनेक लोक माझ्या मदतीसाठी आले.आम्ही दिवसभर नदी साफ केली आणि त्या नदीत निघालेल्या सगळ्या सामानापासून वेगवेगळे क्राफ्ट तयार केले. ते क्राफ्ट लोकांना खुप जास्त आवडले.

त्यानंतर मी मागे वळून पाहीले नाही. अपर्णाने तिचे स्टार्टअप सुरु करण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या स्टार्टअपला ‘कुप्पी’ असे नाव दिले. मल्याळमध्ये कुप्पीचा अर्थ बॉटल होतो. सुरुवातीला अपर्णा बॉटल गोळा करायची तेव्हा तिला लोक कुप्पी म्हणून चिडवायचे. म्हणून तिने त्याच नावाने तिचा स्टार्टअप सुरु केला.

अपर्णा क्राफ्टचे अनेक वर्कशॉप घेते. लॉकडाउनमध्ये तिने अनेक वर्कशॉप घेतले आहेत आणि ते खुप यशस्वी झाले आहे. तिने घरातील एका रुमला स्वत:चे ऑफिस बनवले आहे. तिने शाळेतील मुलांसाठी अनेक वर्कशॉप घेतले आहेत. अपर्णाला तिच्या या स्टार्टअपमधून महिन्याला ४० हजार रुपये मिळतात. तिला तिचा हा व्यवसाय अजून वाढवायचा आहे.

शेवटी अपर्णाने सांगितले की, ‘आपण सणांच्या वेळी बाजारातून अनेक शोच्या वस्तू आणतो. पण यापेक्षा चांगले आहे की, तुम्ही घरात थोडा वेळ काढा आणि वेगवेगळ्या वस्तू तयार करा. काहीतरी असे बनवा ज्याचा तुम्हाला आणि पर्यावरणाला उपयोग होईल’.

महत्वाच्या बातम्या –

लाॅकडाऊनमध्ये ट्रायपाॅड मिळत नव्हता मग जुगाडूने घरीच बांबूपासून बनवला ट्रायपाॅड; जाणून घ्या कसा..

दोन वेळेच्या जेवणाची होती पंचाईत; मात्र गडी खचला नाही तर लढला; करतोय करोडोंची उलाढाल

मूतखड्यामुळे त्रस्त आहात? ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा व मिळवा मुतखड्यापासून मुक्ती

जोडप्याने छतावरच लावल्या अडीचशे प्रकारच्या भाज्या; ह्या पद्धतीने पिकवता येतील घरीच सर्व भाज्या..

कडू कारल्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय? या ६ प्रकारे करून पहा नक्की आवडेल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.