हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ आजकाल त्याच्या अभिनयामुळे नाही तर ऑस्करशी संबंधित वादामुळे चर्चेत आला आहे. ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूड अभिनेता विल स्मिथने सुत्रसंचालक क्रिस रॉकला स्टेजवर जाऊन कानाखाली लगावली होती. यानंतर अभिनेता विल स्मिथने त्याची माफी देखील मागितली होती.(hollywood actor give resignation from academy of motion picture arts and sciences organization)
यादरम्यान अभिनेता विल स्मिथबाबत आणखी एक बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हॉलिवूड अभिनेता विल स्मिथने अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सुत्रसंचालक क्रिस रॉकसोबत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता विल स्मिथने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
शुक्रवारी रात्री अभिनेता विल स्मिथनेही एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनामध्ये अभिनेता विल स्मिथने आपल्या कृत्याबद्दल सर्वांची माफी मागितली आहे. त्याने लिहिले की, “९४ व्या ऑस्कर सोहळ्यात मी जे काही केले ते लज्जास्पद, धक्कादायक होते. मी दुखावलेल्या लोकांची यादी मोठी आहे. मी अकादमीचा विश्वासघात केला आहे. मी या सर्व गोष्टींसाठी दुःखी आहे. म्हणून मी अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे”
“मी केलेल्या कृत्याबाबत बोर्डाकडून जी कारवाई करण्यात येईल. त्या कारवाईचे परिणाम स्वीकारायला मी तयार आहे”, असे अभिनेता विल स्मिथने निवेदनात म्हंटल आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी अभिनेता विल स्मिथला पाठिंबा दर्शवला आहे. तर काही जणांनी त्याच्या या कृत्याचा विरोध केला आहे.
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सुत्रसंचालक क्रिस रॉक स्टेजवर होस्ट करत होता. यावेळी अभिनेता विल स्मिथसोबत सगळेजण उपस्थित होते. मध्येच बोलता बोलता क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेटवर घाणेरडा जोक मारला. त्यामुळे यावर चिडून स्मिथ स्टेजवर गेला आणि त्याने क्रिस रॉकच्या कानाखाली लगावली. तसेच “माझ्या पत्नीचे नाव पुन्हा तुझ्या तोंडातून घेऊ नकोस” असे क्रिसला सांगितले.
यावर क्रिसने ही मी अस करणार नसल्याचे म्हणले. या सर्व घटलेल्या प्रकारामुळे दोन मिनीट पुरस्कार सोहळ्यात शांतता पसरली होती. परंतु पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावर्षी विल स्मिथला किंग रिचर्ड या चित्रपटासाठी नामांकित करण्यात आले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
KKR Vs PBKS च्या मॅचमध्ये रसेलने मारले ८ सिक्सर पण चर्चा मात्र सुहाना खानचीच; व्हायरल झाले बोल्ड फोटो
पंतप्रधान पद हातातून जाताना पाहून इम्रान खान यांना आली बरखा दत्तची आठवण, केला ‘हा’ गंभीर आरोप
CRPF च्या बंकरवर बॉम्ब टाकणाऱ्या महिलेला अटक, याआधीही तिच्यावर अनेक गुन्हे झालेत दाखल