Share

मालेगावच्या उर्दुघराला कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खानचे नाव, महापालिकेत बहुमताने ठराव मंजूर

urdu-ghar-muskan-khan-

कर्नाटकमधील(Karnatak) हिजाब प्रकरणातून प्रकाश झोतात आलेली विद्यार्थिनी हिजाब गर्ल मुस्कान खान(Muskan Khan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी मालेगावमधील(Malegaon) उर्दू घराला मुस्कान खानचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा महापौरांनी केली होती. गुरुवारी मालेगाव महापालिकेच्या झालेल्या सभेत या निर्णयाचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.(hizab girl muskan khan name to urdu ghar in malegaon)

राज्य शासनाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या उर्दू घर इमारतीला आता मुस्कानचं नाव देण्यात आलं आहे. पण या निर्णयाला भाजप आणि जनता दलाच्या सदस्यांनी जोरदार विरोध दर्शवत महापालिकेच्या ऑनलाईन सभेत गोंधळ घातला. शिवसेनेने या ठरावाच्या वेळी तटस्थ भूमिका राहण्याची भूमिका घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी या ठरावाला समर्थन दिल्यामुळे मुस्कान खानच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मालेगाव महापालिकेत उर्दू घराला मुस्कान खानचे नाव देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यात हिजाब गर्ल मुस्कान खानचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

मालेगाव महापालिकेने आठ कोठी रूपये खर्च करून उर्दू घराची अद्ययावत इमारत बांधली आहे. विशेष बाब म्हणजे तेढ निर्माण करणारी नावे सरकारी इमारतींना देऊ नये, असा सरकारी आदेश असताना सुद्धा मुस्कान खानचे नाव देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या निर्णयामुळे नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या निर्णयाबाबत बोलताना मालेगाव महापालिकेच्या ताहेरा शेख म्हणाल्या की, भारत हा गंगा जमुना संस्कृतीचा देश आहे. या देशात सर्वधर्मीयांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकात हिजाब बंदीविरोधात लढणाऱ्या महिलांना धैर्य देण्याचे काम मुस्कानने केलं आहे.”

हिजाब गर्ल मुस्कान खानचे कौतुक करण्यासाठी आणि इतर महिलांना हिंमत देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे मालेगावच्या महापौर ताहेरा शेख यांनी सांगितले आहे. हा निर्णय घेण्यात कोणतही जातीय कारण नाही, असे ताहेरा शेख यांनी स्पष्ट केले आहे. पण या निर्णयाला भाजप आणि जनता दलाने विरोध दर्शवला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
भन्नाट लव्ह स्टोरी: दोन मित्रांच्या बायका पडल्या एकमेकांच्या प्रेमात, नंतर नवऱ्यांना घटस्फोट देऊन केले लग्न
9 वर्षांनंतर ट्यूशन टीचरला भेटायला आला माजी विद्यार्थी, चाकू भोकसून झाला फरार, कारण वाचून हादराल
अखेर वडिलांना दिलेलं ‘ते’ वचन केलं पुर्ण, नागार्जुनने १०८० एकर वनभूमी घेतली ताब्यात

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now