गायिका सुनिधी चौहानने आपल्या नवऱ्यासोबत सुरु असलेल्या वादावर सोडले मौन; म्हणाली…

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान तिच्या खाजगी आयुष्यामुळे खुप चर्चेत आली आहे. सध्या सुनिधी आणि तिचा पती यांच्यात वाद असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. सुनिधीच्या पतीचे नाव हितेश सोनिक आहे.

सोनिकने सुनिधीसोबत असलेल्या वादावर माध्यमांशी बोलताना या गोष्टी अफवा आहेत, आमच्यात कुठलाही वाद नाहीये, असे म्हटले होते. पण त्यावेळी सुनिधीने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

आता मात्र सुनिधीने तिच्या पतीच्यासोबत असलेल्या वादाच्या चर्चेवर मौन सोडले आहे. आमच्यात सर्व काही ठिक आहे. मी आणि हितेश सोनिक एकत्रच राहतो, असे सुनिधीने म्हटले आहे. ई-टाईम्सला सुनिधीने मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने हे म्हटले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांच्याही वैवाहीक आयुष्यात उलथापालथ झाली होती. काही दिवसांपुर्वीच या दोघांमध्ये पॅचअप झाले आहे. त्यानंतर ते दोघेही एकत्र व्हॅकेशनमध्ये एन्जॉय करण्यासाठी गोव्याला गेले होते. यानंतरही दोघांच्या लग्नावर प्रश्न उपस्थित होते, ज्यावर सुनिधीने उत्तर दिले नव्हते.

दरम्यान, जेव्हा सुनिधी आणि हितेश वेगळ्या झाल्याच्या बातम्या येत होत्या, तेव्हा हितेशनेच याबाबत स्पष्टीकरण दिले होते. आम्ही एकाच घरात, एकाच छताखाली राहत आहोत. लॉकडाऊन दरम्यान आम्ही घरातील कामेही वाटून घेतली होती, असे हितेशने मीडियासमोर म्हटले होते.

सुनिधी हितेशने २०१२ मध्ये लग्न केले होते. गोव्यात त्या दोघांनी लग्नाचे ग्रँड रिसेप्शनही दिले होते. लग्नाच्या पाच वर्षांनंतर सुनिधीला एक मुलगाही झाला आहे. ती बऱ्याचदा आपल्या मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

महत्वाच्या बातम्या-

टाटाची भन्नाट ऑफर! महिन्याला ३,५५५ रुपये भरा आणि घरी घेऊन या ‘ही’ महागडी कार
लोकांना खायला अन्न नाही, अन् तुम्ही पैसे उडवता! लाजा वाटूद्या; अभिनेत्यांवर नवाजूद्दीन संतापला
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आता रिया चक्रवर्ती आली पुढे; म्हणाली, मला डायरेक्ट मेसेज करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.