केरळमध्ये इतिहास घडला! काॅंग्रेसचा सलग दुसऱ्यांदा लाजिरवाना पराभव

केरळ |  पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी आज मतमोजणी सुरू आहे. पाचही राज्यांमध्ये गुगाल कोण उधळणार याकडे लक्ष लागले आहे. केरळ विधानसभेत १४० जागांसाठी मतदानप्रक्रिया पार पडली होती.

केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट आणि काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. तसेच भाजपही  मोठ्या ताकदीने उतरली होती. निकालानुसार लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंडने बहूमतासाठी लागणारा आकडा पार केला आहे.

एलडीएफ ९० जागांवर आघाडीवर आहे. एलडीफने सत्ता कायम राखली आहे. युडीफने ४७ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर एनडीएला अवघ्या २ जागांवर आघाडी मिळाली आहे. केरळमध्ये पुन्हा एकदा एलडीफची सत्ता स्थापन होण्याचं दिसून येत आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन कामाच्या जोरावर पुन्हा एकदा केरळचा गड राखण्यात यशस्वी झाले आहेत. केरळमधील जनतेने भाजपला पुन्हा एकदा सत्तेपासून दुर ठेवले आहे. तर काँग्रेस नेते राहूल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे.

केरळमध्ये एलडीएफ पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं होतं. २०१६ मध्ये एलडीएफने ९१ जागांवर विजय मिळवत केरळमध्ये सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसने २२ जागा  जिंकल्या होत्या.

आता २०२१ च्या निवडणूकीत एलडीएफने सलग दुसऱ्यांदा काँग्रेसचा पराभव केला आहे. केरळमध्ये पाच वर्षांनी सत्ताबदल होतो. मात्र विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दुसऱ्यांदा केरळचा गड खेचून आणला आहे.
महत्वाच्या बातम्या-
बंगालच्या वाघिनीने उडवला भाजपचा धुव्वा; ममतांच्या तृणमूलची विजयी आघाडी
काय सांगता! ऑक्सिजनसाठी पिंपळाच्या झाडाखाली झोपले रुग्ण, प्रकृतीही झाली स्थिर
इंडियन आयडलमध्ये बापाविना दिसणार सायली कांबळे, तिने सांगीतलेले कारण ऐकून तुम्हालाही येईल रडू

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.