बिहारमध्ये इतिहास घडणार! मोदी, शहांना धक्का देत तेजस्वी यादव आघाडीवर

देशाचे लक्ष लागलेल्या बिहार निवडणूकीचे सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये २४३ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. नितीशकुमार मुख्यमंत्री होणार की तेजस्वींची जादू दिसणार हे आता काही वेळातच समजणार आहे.

सुरुवातीच्या निकालातून भाजपला धक्का बसला असल्याचे दिसून येत आहे. तेजस्वी यादवांची गाडी जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. याचबरोबर काँग्रेस देखील आघाडीवर आहे. सुरुवातीचा कल हाती आला असून मोदी, शहांना मोठा धक्का बसत असल्याचे या निकालातून दिसत आहे.

तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडी 72 जागांवर तर नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए 40 जागांवर पुढे आहे. भाजपला हा एकप्रकारे मोठा धक्का मानला जात आहे. नितीशकुमार यांनी या निवडणुकीत मोठी तयारी केली होती.

राघोपूर विधानसभा क्षेत्रात तेजस्वी यादव लढत आहेत. सध्या ते आघाडीवर आहेत. बिहारची जनता मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सहाव्यांदा मुख्यमंत्री बनवण्याची संधी देणार की युवा चेहरा तेजस्वी यादव यांना संधी देणार याकडे लक्ष लागले आहे.

काही वेळातच चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या सभा या ठिकाणी घेतल्या. मात्र सुरुवातीचे कल त्यांच्या विरोधात जात आहेत. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुपारपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.